सध्या अनेक बाइक उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून दमदार वैशिष्ट्य असलेल्या बाईक्स कमीत कमी किमतीत लॉन्च करण्यात येत आहेत व काही कंपन्यांच्या माध्यमातून स्पोर्ट बाईक देखील लॉन्च करण्यात येत आहेत. तरुणांच्या दृष्टिकोनातून बघितले तर तरुणांमध्ये प्रामुख्याने महागड्या अशा स्पोर्टी बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व असे तरुण अशा बाईकच्या शोधात किंवा प्रतीक्षेत असतात.
बऱ्याच वर्षापासून जर आपण पाहिले तर रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या बाईकने तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे. आजपर्यंत तरुणांपासून ते सगळ्या वयोगटातील लोकांनी रॉयल इन्फिल्डच्या बाईक्स वापरल्या व त्यांचे क्रेझ आजही त्यांच्यात दिसून येते.

त्यामुळे तुम्हाला देखील रॉयल एनफिल्ड ची बाईक घ्यायची असेल तर कंपनी येत्या 12 ऑगस्टला रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 लॉन्च करणारा असून या बाईकच्या मॉडेलचा आता अपडेटेड भाग लॉन्च केला जात आहे व यामध्ये थोडासा बदल आणि काही नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या अगोदर असलेल्या क्लासिक 350 पेक्षा या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक नवीन बदल केल्यामुळे तिचा लुकमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे.
कशी आहे नवीन अपडेट रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे डिझाईन?
2024 रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मॉडर्न क्लासिक स्टाईल मध्ये येणार आहे व या डिझाईनला एक ओल्ड स्कूल वाईब आहे. टीयर ड्रॉप इंधन टाकी देण्यात आली असून यासोबतच गोल आकाराचा हेडलॅम्प आणि लांब, वक्र फेंडर देखील देण्यात आलेला आहे. तसेच या नवीन मॉडेलमध्ये नवीन कलर योजना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
काय आहेत या बाईकची वैशिष्ट्ये?
नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये हेडलाईट करिता पायलेट लॅम्प्स तसेच इंडिकेटर्स आणि टेललाईट करता एलईडी लाईटचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच या बाईकमध्ये ऍडजेस्टेबल ब्रेक आणि क्लच लिवर्स देण्यात आलेले आहेत. परंतु ही वैशिष्ट्ये हायर स्पेसिफिकेशन वेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.
इंजिन बद्दल पाहिले तर या बाईक मध्ये जे सिरीज इंजिन देण्यात आले असून जे 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकची पावर पाच स्पीड गिअर बॉक्सची लिंक असणार आहे.
महत्वाचे म्हणजे रॉयल एनफिल्ड ही कंपनी प्रोजेक्ट J12 वर काम करत असून यामध्ये न्यू जनरेशनच्या रॉयल एनफिल्डनचे 350 मॉडेल्स वर अनेक अपग्रेड्स मिळणार आहे.
यासोबतच टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स सारखे बऱ्याच गोष्टी देण्यात आलेले आहेत मात्र ब्रेकिंग सेटअप आणि चाके देखील तसेच राहणार आहेत. तसेच सध्याचे जे क्लासिक 350 हे मॉडेल आहे त्या मॉडेल प्रमाणेच रॉयल एनफिल्डच्या विशिष्ट प्रकरण मध्ये आलोय व्हिल देण्यात येणार आहेत.
किती राहील या बाईकची किंमत?
नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 या बाईक मध्ये थोडीफार किंमत वाढीची अपेक्षा असून साधारणपणे ही बाईक एक लाख 95 हजार ते दोन लाख तीस हजार रुपये एक्स शोरूम च्या किमतीमध्ये मिळू शकते.