7 Seater Car: फॅमिलीसाठी 7 सिटर कार घ्यायची असेल तर ‘या’ आहेत स्वस्तातल्या मस्त आणि आरामदायी अशा कार! वाचा माहिती

Published on -

7 Seater Car:- जेव्हा आपण कार घ्यायचा निर्णय घेतो आणि कारची निवड करतो तेव्हा प्रामुख्याने दोन ते तीन मुद्दे याबाबत प्रकर्षाने बघत असतो. यातील पहिला बघितला तर तुमचा आर्थिक बजेट आणि त्या बजेटमध्ये मिळणारी कार, दुसरा म्हणजे कार घेताना त्या कारमध्ये कमीत कमी कुटुंबात असलेले सगळे सदस्य आरामात प्रवास करू शकतील अशी स्पेस असलेली कार आणि तिसरे म्हणजे त्या कारचे वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो.

भारतीय कार बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त जर कारला डिमांड असेल तर ती जास्त सीट असलेल्या कारला आहे. कारण जास्त आसनक्षमता असलेल्या कार या कुटुंबासाठी आणि लांबचा प्रवास करण्यासाठी खूप योग्य पर्याय मानल्या जातात. त्यामुळे प्रामुख्याने सात सीटर कारला प्राधान्य दिले जाते.

भारतीय कार बाजारपेठेमध्ये कमीत कमी किमतीमध्ये परवडतील अशा सात सिटर कार उपलब्ध आहेत. त्यातील काही कारच्या किमती या 5 लाख 32 हजारापासून सुरू होतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा काही महत्त्वपूर्ण सात सिटर कारची माहिती घेणार आहोत जे तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम राहतील आणि तुमच्या बजेटमध्ये मिळतील.

 या आहेत भारतातील स्वस्तातल्या उत्तम सात सीटर कार

1- मारुती सुझुकी एर्टिगा मारुती सुझुकीची एर्टिगा ही एक चांगली मागणी असलेली कार असून कंपनीच्या माध्यमातून या कारमध्ये 1.5- लिटर पेट्रोल इंजन देण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर ही कार सीएनजी प्रकारामध्ये देखील तुम्हाला मिळू शकते. या कारमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्य आहेतच.

परंतु मायलेजच्या बाबतीत देखील ही कार खूप चांगली आहे. पेट्रोलमध्ये ही कार 20 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यास सक्षम आहे सीएनजी व्हेरियंट 26.11 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. जर आपण मारुती सुझुकीच्या एर्टिगाची किंमत पाहिली तर ती आठ लाख 69 हजार रुपये इतकी आहे.

2- रेनॉल्ट ट्रायबर रेनॉल्ट कंपनीची ही कार देखील उत्तम असून ग्राहकांच्या माध्यमातून या कारला देखील खूप चांगली पसंती दिली जाते. परवडणाऱ्या किमतीत मिळणारी 7 सीटर कार असुन ती आकर्षक वैशिष्ट्यांसह येते.

कंपनीने या कारमध्ये एक लिटर क्षमतेचे एस्पीरेटेड आणि टर्बो चार्जेड पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला असून ही कार मायलेजच्या बाबतीत देखील उत्तम आहे. साधारणपणे एक लिटरमध्ये ती 19 किलोमीटरचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची किंमत सहा लाख रुपये इतकी आहे.

3- मारुती इको मारुती सुझुकीच्या सात सीटर कारमध्ये सगळ्यात स्वस्तात मस्त आणि आकर्षक व उत्तम वैशिष्ट्य असलेली कार जर कोणती असेल तर ती आहे मारुती इको ही होय. मारुती सुझुकीने या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे के सिरीज ड्युअल जेट WT इंजिन दिले असून ही कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे.

या कारचे मायलेज पाहिले तर पेट्रोल मोडमध्ये ती 19.71 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजीमध्ये ती 26.78 किलोमीटर प्रतीकिलो इतके मायलेज देते. मारुती इकोची किंमत पाहिली तर ती परवडणाऱ्या किमतीमध्ये असून तिची किंमत 5 लाख 32 हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News