महिंद्रा थार रॉक्स दणक्यात झाली लॉन्च; मिळतील 6 एअरबॅग आण…

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून सर्वात लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही महिंद्रा थार ची महिंद्रा थार रॉक्स ही पाच डोअर एडिशन लॉन्च करण्यात आलेली आहे.

Ajay Patil
Updated:
mahindra thar roxx

भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतींपासून तर काही लाखो रुपयांच्या अनेक वैशिष्ट्य असलेल्या कार लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे आता कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

भारतीय कार बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या कार्सला विशेष पसंती दिली जाते. त्यातल्या त्यात महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या कार्सला देखील खूप मोठ्या प्रमाणावर पसंती असते.

महिंद्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा कंपनीची थार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून सर्वात लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही महिंद्रा थार ची महिंद्रा थार रॉक्स ही पाच डोअर एडिशन लॉन्च करण्यात आलेली आहे. या कारमध्ये कंपनीने अनेक नवीनतम अशी वैशिष्ट्ये दिली असून ग्राहकांना ती नक्कीच पसंत पडेल.

 काय आहेत महिंद्रा थार रॉक्समधील वैशिष्ट्ये?

महिंद्राच्या या थार रॉक्सची रचना ही तीन डोर थार प्रमाणेच बॉक्सि प्रोफाईलचे अनुसरण करते व त्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे. या रॉक्समध्ये सी आकाराचे एलईडी डीआरएल आणि नवीन बॉडी कलर सहा स्लाईट ग्रील्ससह एलईडी हेडलाईट देण्यात आले आहे.

या कारचे समोरचे बंपर आकर्षक बनवण्यात आले असून त्यावर सिल्वर एलिमेंट्स देखील देण्यात आलेले आहेत. फॉगलाईट आणि टर्न इंडिकेटर अगोदरच्या तीन डोअर थार प्रमाणेच देण्यात आलेले आहेत. परंतु त्यांची रचना मात्र बदलण्यात आलेली आहे.

 कशी आहे या कारची साईड प्रोफाइल?

जर आपण या कारचे साईड प्रोफाईल बघितली तर या ठिकाणी तुम्हाला दोन अतिरिक्त दरवाजे पाहायला मिळतील तसेच सी पिलरवर मागील दरवाजाचे हँडल बसवण्यात आलेले आहे. तसेच एकोणावीस इंच ड्युअल टोन अलोय व्हील्स आणि एक फूट रेस्ट देखील देण्यात आलेले आहे.

इतकेच नाही तर या कारमध्ये मॅट रूफ देखील देण्यात आले असून ज्यामध्ये पॅनोरेमिक सनरूफ आहे. तसेच टेल लाईटला सी आकार देण्यात आलेला असून मागच्या बाजूला टेलगेट माउंट केलेले स्पेअर व्हील देण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे मागच्या काचेवर देखील वायपरची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच या कारचा मागची खिडकी आणि मागील दरवाजा स्वतंत्रपणे उघडतो.

 कसे आहे इंटेरियर?

तसेच थार रॉक्सची केबिन ही ब्लॅक अँड व्हाईट थीम वर आधारित असून सीटला पांढऱ्या चामड्याचे अपहोलस्ट्री मिळते आणि डॅशबोर्डला काळ्या लेदररेट रॅपिंग करण्यात आलेली आहे व त्यासोबत कॉपर स्टिचिंग देखील देण्यात आलेली आहे. तसेच समोरच्या प्रवाशासाठी मध्यभागी आर्मरेस्ट देखील देण्यात आला आहे.

दुसऱ्या लाईन अपमध्ये आयसोफिक्स अँकर सीट्स, फोल्ड करता येतील असे सेंटर आर्मरेस्ट, थ्री पॉईंट सीटर बेल्ट आणि सर्व प्रवाशांकरता ऍडजेस्टेबल हेडरेस्टस आहेत.

तसेच या पाच डोअर कारमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि त्याशिवाय 10.25 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली असून याशिवाय मागील एसी वेंटसह स्वयंचलित हवामान नियंत्रण, हवेशीर फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जिंग आणि पुश बटन स्टार्ट- स्टॉपसह कीलेस एन्ट्री सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

 सुरक्षिततेच्य दृष्टिकोनातून काय आहेत सुविधा?

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कार मध्ये सहा एअर बॅग, 360 डिग्री कॅमेरा सेटअप तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रणासारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. एवढेच नाही तर या कारमध्ये  ADAS सिस्टम देखील देण्यात आलेली आहे.

 किती आहे महिंद्रा थार रॉक्सची किंमत?

जर आपण महिंद्राच्या थार कारचे बेस पेट्रोल MX1 प्रकाराची प्राईज बघितली तर ती बारा लाख 99 हजार रुपये आहे आणि बेस डिझेल मॉडेलची किंमत 13 लाख 99 हजार एक्स शोरूम इतकी आहे. या तुलनेमध्ये या नवीन थार रॉक्स कारची किंमत 1.64 लाख रुपये अधिक महाग आहे. या कारची बुकिंग सुरू करण्यात आलेली आहे व डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरु होईल अशी एक शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe