Loan Information: ओला देणार आता 10 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन! कसे मिळणार ओला द्वारे कर्ज? वाचा माहिती

ओला एप्लीकेशनद्वारे दहा लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. हा उपक्रम सुरू करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जे ओलाचे विविध युजर्स आहेत त्यांच्या आर्थिक गरजा ताबडतोब पूर्ण करणे व त्यांना सुलभ आणि त्रासमुक्त कर्ज अर्ज प्रक्रिया प्रदान करणे हे आहे.

Published on -

Loan Information:- आर्थिक अडचणीच्या वेळी बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात व नॉन बँकिंग फायनान्स कंपनी किंवा त्यांच्या माध्यमातून पर्सनल लोन करीता अर्ज करून स्वतःची आर्थिक गरज भागवतात. पर्सनल लोन हे देशातील सर्वच बँकांच्या आणि नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच एनबीएफसीच्या माध्यमातून दिले जाते.

परंतु आता या सोबतच ओला एप्लीकेशन वरून देखील ओला अॅप यूजर्सना कर्ज घेणे शक्य होणार आहे. याकरिता ओला फायनान्शिअल सर्विसेस आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपनी इनक्रेड फायनान्स यांनी एक धोरणात्मक भागीदारी करण्याचे ठरवले असून

या भागीदारीच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ओला एप्लीकेशनद्वारे दहा लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. हा उपक्रम सुरू करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जे ओलाचे विविध युजर्स आहेत त्यांच्या आर्थिक गरजा ताबडतोब पूर्ण करणे व त्यांना सुलभ आणि त्रासमुक्त कर्ज अर्ज प्रक्रिया प्रदान करणे हे आहे.

 ओला ॲपद्वारे कर्ज घेण्यासाठी ओला द्वारेच अर्ज करावा लागेल

या कर्ज सुविधेचा मुख्य उद्देश ओलाच्या व्यापक वापरकर्त्यांच्या तात्काळ वैयक्तिक गरजा पूर्ण करणे हा आहे. याकरिता ओला मनी आणि इनक्रेड फायनान्स या दोघांच्या भागीदारीमुळे कर्ज प्रक्रिया कार्यक्षम आणि वेगात होणार आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना सर्वात्तम आर्थिक सेवा प्रदान करता येणार आहे.

यामध्ये ओला आणि इनक्रेड फायनान्स या दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी वचनबद्ध असून या नवीन उपक्रमामुळे आता ओलाच्या युजर्सना कर्ज मिळवणे अतिशय सोपे होणार आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा एक शक्तिशाली उपाय देखील मिळणार आहे.

 काय म्हणाले इनक्रेड फायनान्सचे सीईओ?

या उपक्रमाबद्दल बोलताना इनक्रेड फायनान्सचे सीईओ( ग्राहक वित्त) पृथ्वी चंद्रशेखर यांनी म्हटले की, आमचे उद्दिष्ट क्रेडिटच्या प्रवेशाचे रूपांतर करणे आणि ते अधिक सुलभ करणे हे आहे.

ओला सोबतच आमची भागीदारी ही या मोहिमेतील एक महत्त्वाची पायरी असून यामध्ये प्रगत अशा तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून ही भागीदारी एक त्रास मुक्त कर्जाचा अनुभव प्रदान करते.

इनक्रेड फायनान्स आणि ओला मनी यांच्या या उपक्रमामुळे ओला वापरकर्त्याना आता झटपट कर्जाची सुविधा मिळणार असून आर्थिक गरज देखील पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News