Cheapest Automatic Car: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार! देतात 26 किलोमीटरच्या मायलेज, वाचा माहिती

कुठलाही ग्राहक जेव्हा कार घेण्यासाठी  जातो तेव्हा तो परवडणाऱ्या किमतीत चांगली वैशिष्ट्ये मिळतील अशा कारच्या शोधात असतो. ऑटोमॅटिक कार घेण्याकडे गेल्या काही वर्षात लोकांचा कल वाढला असून अशा प्रकारचे कार घेण्याचे फायदे देखील अनेक आहेत.

Published on -

Cheapest Automatic Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा कल जर पाहिला तर तो कार खरेदीच्या  दृष्टिकोनातून खूप बदलला असून ग्राहक आता एसयूव्ही सेगमेंट मधील कार खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या माध्यमातून स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक कार लॉन्च करण्यात आल्यामुळे ग्राहकांना पर्याय देखील मोठ्या प्रमाणावर आता उपलब्ध झालेले आहेत.

याप्रमाणे जर आपण ऑटोमॅटिक कारचा विचार केला तर काही वर्षात ग्राहकांच्या माध्यमातून ऑटोमॅटिक कार घेण्याला देखील मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे.

कुठलाही ग्राहक जेव्हा कार घेण्यासाठी  जातो तेव्हा तो परवडणाऱ्या किमतीत चांगली वैशिष्ट्ये मिळतील अशा कारच्या शोधात असतो. ऑटोमॅटिक कार घेण्याकडे गेल्या काही वर्षात लोकांचा कल वाढला असून अशा प्रकारचे कार घेण्याचे फायदे देखील अनेक आहेत.

कारण अशा ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्हाला परत परत गिअर्स बदलण्याची चिंता राहत नाही. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात मस्त अशा ऑटोमॅटिक कारच्या शोधात असाल तर या लेखामध्ये आपण काही महत्त्वाच्या ऑटोमॅटिक कारची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

 या आहेत चांगल्या मायलेज देणाऱ्या स्वस्तात मिळतील अशा ऑटोमॅटिक कार

1- मारुती वॅगनार मारुती सुझुकीची ही कार ग्राहकांमध्ये पसंतीची असलेली कार असून या कारमध्ये दोन भिन्न पेट्रोल इंजिन पर्याय येतात. यामधील 1.2 लिटर पेट्रोल इंजिन हे ऑटोमॅटिक प्रकारामध्ये वापरले गेले आहे.

या कारची किंमत सहा लाख 45 हजार रुपये आहे व त्यामुळे तुम्ही देखील ऑटोमॅटिक कार शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम राहील.

2- मारुती सेलेरिओ मारुती सुझुकीची सेलेरिओच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये एक लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून हा ऑटोमॅटिक प्रकार सेलेरिओच्या VXI आणि ZXI या मॉडेल वर आधारित असून या कारची किंमत सहा लाख 29 हजार रुपये आहे.

3- मारुती एसप्रेसो मारुती सुझुकीच्या मारुती एस प्रेसोचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट VXI मॉडेल वर आधारित असून यात एक लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 68 पीएस पावर आणि 90 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत पाच लाख 67 हजार रुपये इतकी आहे.

4- मारुती अल्टो के 10- मारुती सुझुकीच्या अल्टो के 10 चे ऑटोमॅटिक व्हेरिएंट VXI मॉडेल वर आधारित असून यात एक लिटर पेट्रोल इंजिन आहे. तर आपण मारुती अल्टो के 10 ची किंमत पहिली तर ती पाच लाख 51 हजार रुपये आहे.

5- रेनॉल्ट क्विड रेनॉल्ट कंपनीची क्विड ही कार ऑटोमॅटिक प्रकारात उपलब्ध असून यामध्ये कंपनीने एक लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरले असून या कारची किंमत साधारणपणे पाच लाख 44 हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News