Tourist Places:- पावसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते व देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांवर देशातीलच नव्हे तर देशातील लाखो पर्यटकांची गर्दी होत असते. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर पावसाळ्यामध्येच नाहीतर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही भेट दिली तर त्या ठिकाणाचे निसर्ग सौंदर्य मनाला मोहून टाकते.
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत की त्या ठिकाणी तुम्ही केव्हाही भेट दिली तरी मनाला एक निरव शांतता लाभते व दररोजच्या धावपळीच्या जीवनापासून काही क्षण का होईना आपल्याला मुक्ती मिळते.

महाराष्ट्र मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत व त्यामध्ये महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक बेस्ट असे हिल स्टेशन असून तुम्ही तुमच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये किंवा कोणत्याही कालावधीत तुमचे कुटुंब किंवा मित्रांसोबत या ठिकाणची ट्रिप प्लॅन करू शकतात व निसर्गाचे सौंदर्य जवळून अनुभव शकतात.
जर तुमचा देखील महाबळेश्वरला फिरायला जायचा प्लान असेल तर त्या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत लपलेली अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत व त्या ठिकाणी तुम्ही भेट देणे खूप गरजेचे आहे.नेमकी महाबळेश्वर मधील ही ठिकाणी कोणती आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.
महाबळेश्वरला जा व ही ठिकाणे पहा
1- एलिफंट पॉइंट– महाबळेश्वर मधील एलिफंट पॉइंट हा विंटेज पॉईंट म्हणून देखील ओळखला जातो. या पॉइंटला एलिफंट हे नाव पडण्यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो काही परिसर आहे तो हत्तीच्या डोके व पाठीसारखा दिसतो. या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व पावसाळ्यामध्ये या ठिकाणाची हिरवळ पर्यटकांचे मन वेधून घेते.
2- वेण्णा तलाव(लेक)- हा एक मानवनिर्मित तलाव असून महाबळेश्वर मधील हे ठिकाण एक आकर्षणाचे ठिकाण आहे. वेण्णा तलाव चारही बाजूंनी झाडे आणि वेलींनी वेढलेला असून या ठिकाणचे थंड आणि अल्हाददायक वातावरण मनाला खूप मोठ्या प्रमाणावर आनंद देते.
तसेच या ठिकाणी तुम्ही घोडेस्वारीचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटू शकतात. या ठिकाणचा सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहण्यामध्ये निराळीच मजा असून त्यासाठी संध्याकाळी भेट देणे गरजेचे आहे.
3- केट्स पॉईंट– हे ठिकाण देखील महाबळेश्वर मधील एक सुंदर आणि निसर्गाने समृद्ध असे ठिकाण असून महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
केट्स पॉईंटच्या आजूबाजूला दऱ्या खोऱ्या तसेच भव्य पर्वतांच्या रांगा यांचे दृश्य खूप विलोभनीय असून मनाला आनंद देणारे आहे.
4- मॅप्रो गार्डन– तुमच्या सोबत जर लहान मुलं असतील तर त्यांच्या करिता खास ठिकाण म्हणजे मॅप्रो गार्डन हे होय. मॅप्रो गार्डन खास करून स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी प्रत्येक वर्षी स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन केले जाते. लहान मुलांना खास करून आवडेल असे ठिकाण असून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत विकेंड प्लान या ठिकाणी करू शकतात.
5- तापोळा–तापोळा हे महाबळेश्वर मधील शिवसागर तलावाच्या काठावर वसलेले एक गाव असून ते निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. तेव्हा तुम्ही या गावाला भेट देता तेव्हा त्या ठिकाणी असलेली हिरवीगार जंगले आणि उंचच उंच टेकड्या पाहण्याची मजा काही औरच असते.