रॉयल एनफिल्डचे मार्केट होणार खल्लास! ब्रिटनच्या कंपनीने लॉन्च केली धमाकेदार बाईक, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

रॉयल एनफिल्ड सारख्या बाईक्सला तगडी टक्कर देईल अशी बाईक ब्रिटनच्या कंपनीने लॉन्च केली. या बाईकचे नाव बीएसए गोल्ड स्टार 650 असून भारतातील रॉयल एनफिल्ड या कंपनीची या बाईकची थेट स्पर्धा असणार आहे.

Ajay Patil
Published:
bsa gold star 650 bike

भारतामध्ये अनेक नामांकित अशा बाईक उत्पादक कंपन्यांनी आकर्षक फीचर्स  आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये बाईक लॉन्च केले असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

यामध्ये काही हजारांपासून तर काही लाखो रुपये किमतीच्या बाईक सध्या मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले असून आजकालच्या तरुणाईचा कल ओळखून कंपन्यांनी त्या पद्धतीच्या बाईक देखील लॉन्च केलेले आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर रॉयल एनफिल्ड सारख्या बाईक्सला तगडी टक्कर देईल अशी बाईक ब्रिटनच्या कंपनीने लॉन्च केली. या बाईकचे नाव बीएसए गोल्ड स्टार 650 असून भारतातील रॉयल एनफिल्ड या कंपनीची या बाईकची थेट स्पर्धा असणार आहे.

 काय आहेत या बाईकमध्ये फीचर्स?

कंपनीने या बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त असे फीचर्स दिले असून यामध्ये बसवलेले इंजिन 6500 आरपीएम वर 45 बीएचपीची पावर देते आणि चार हजार आरपीएम वर 55 एनएम टॉर्क जनरेट करते.

या बाईकमध्ये मोटर सोबत पाच स्पीड गिअर बॉक्स बसवण्यात आला असून या बाईकमध्ये ड्युअल चॅनेल ABS चे फीचर्स आहे व या बाईकच्या पुढील चाकामध्ये 320 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला असून मागील चाकात 255 मीमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

 किती आहे या बाईकची किंमत?

बीएसए गोल्ड स्टार 650 चे वेगवेगळे व्हेरियंट बाजारामध्ये वेगवेगळ्या किमती रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले असून ही बाईक दोन कलर पर्यायामध्ये लॉन्च करण्यात आली आहे व ते कलर पर्याय म्हणजे हायलँड ग्रीन आणि इन्सेनिया रेड हे आहेत.

त्याची एक्स शोरूम किंमत तीन लाख रुपये आहे व याचा मिड नाईट ब्लॅक आणि डॉन सिल्वर कलर तीन लाख 12 हजार रुपयांच्या किमती सह लॉन्च करण्यात आली आहे.

तसेच बाईकमध्ये शाडो ब्लॅक कलर उपलब्ध असून त्याची एक्स शोरूम किंमत तीन लाख 16 हजार रुपये आहे. इतकेच नाही तर गोल्ड स्टार 650 लाईनची टॉप एंड लेगसी एडिशन शिन सिल्वर भारतीय बाजारपेठेमध्ये तीन लाख 35 हजार रुपयांच्या एक्स शोरूम किमतीसह लॉन्च करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe