बायकोनेही लग्न झाल्यापासून हात इतक्यांदा ओढला नाही, इतका तुम्ही.. रक्षाबंधनच्या कार्यक्रमातील अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यात जनसन्मान यात्रा काढली जात आहे. रविवारी ही यात्रा जुन्नर तालुक्यात आली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार दिलखुलासपणे बोलत होते.

ajit pawar

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यात जनसन्मान यात्रा काढली जात आहे. रविवारी ही यात्रा जुन्नर तालुक्यात आली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार दिलखुलासपणे बोलत होते.

त्यांच्या काही मिश्कील टिप्पणीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. नारायणगाव जवळ आमदार अतुल बेनके मित्र मंडळाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला अजित पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी अजित पवारांची एका महिलेने मुलाखत घेतली. त्यावेळी अजितदादांनी मिश्कील टिप्पणी केली.

अजितदादांची मिश्किल टिप्पणी
रक्षाबंधन कार्यक्रमात उपस्थित महिलांनी इतका माझा हात धरला, ओढला की खरं सांगायचं झालं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्या वेळा माझा हात ओढलेला नाही.

असे म्हणत ते पुढे म्हणाले, पण हे सगळं बहिणीच्या नात्याने महिलांनी केले असून त्या माझ्या बहिणी, माय माऊली आहेत.

योजना चांगली , पण विरोधक न्यायालयात गेले
माझा जन्म काटेवाडीत झाला. नंतर आम्ही बारामतीमध्ये राहत होतो. आमच्या घरी गरीब महिला कामानिमित्त यायच्या. शेतात सुद्धा महिला काम करण्यासाठी यायच्या. महिलांना आवडीची गोष्ट घेता येत नाही.

त्या स्वतः च्या आवडीला मुरड घालतात. लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे.

इतकी चांगली योजना आणली तर विरोधक न्यायालयात गेलेत. आम्ही आता दिले आणि पुढेही देणार आहोत. ४५ हजार कोटी वाटप करणार आहोत. इतके पैसे बाजारपेठेत येणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe