Surya Ghar Mofat Vij Anudan Yojana Rule : गेल्या काही वर्षांपासून मध्यमवर्गीय कुटुंबातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या किमती पासून ते विजबिलपर्यंत सार काही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडल्याचे दिसतय. यामुळे आता वाढत्या वाढीव वीजबिलामुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून सोलर पॅनल इंस्टॉल करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे.
सोलर पॅनल साठी शासनाकडूनही अनुदान दिले जात आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली जात आहे.
या अंतर्गत केंद्रातील सरकारने देशातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी एक किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी तीस हजार, दोन किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60 हजार आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत सोलर पॅनलचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना अनेक राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा देखील यामध्ये समावेश होतो.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी लाखो रुपयांचे अनुदान देते. खरे तर, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला केली होती. विशेष म्हणजे ही योजना घोषित झाल्यापासूनच या योजनेची चर्चा आहे. या योजनेला नागरिकांच्या माध्यमातून तुफान प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
मात्र असे असले तरी अनेकांनां या योजनेबाबत अजूनही सर्वसामान्यांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे जो व्यक्ती भाड्याच्या घरात राहतो त्याला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का. याबाबत योजनेचे नियम काय आहेत.
काय आहेत नियम
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 पर्यंतचे अनुदान मिळते. याचा लाभ देशातील एक कोटी कुटुंबांना दिला जाणार आहे. मात्र यासाठी काही अटी आहेत. यातील एक अट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता तुमच्या छतावर जागा असणे आवश्यक आहे.
म्हणजेच याचा लाभ फक्त स्वतःचे घर असणाऱ्या नागरिकांनाच मिळणार आहे. जे लोक फ्लॅट मध्ये असतात त्यांनाही याचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा फक्त ज्या लोकांच्या नावावर स्वतःचे घर आहे अशाच लोकांना फायदा होणार आहे.
अर्थातच जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.