भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक आकर्षक फीचर्स असलेल्या बाईक सध्या लॉन्च करण्यात आलेल्या आहेत व या नवीन बाईकमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय देखील देण्यात आलेले असल्याने बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि आर्थिक बजेटनुसार बाईक खरेदी करणे शक्य झालेले आहे. परंतु बऱ्याचदा बाईक खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर पर्याय खूप असल्यामुळे कोणती बाईक घ्यावी याबाबत मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. कारण मोठ्या प्रमाणावर सध्या बाईक बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे व प्रत्येक बाईक एकमेकांपासून वैशिष्ट्यांच्या आणि किमतींच्या बाबतीत सरस असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते.
अगदी याच अनुषंगाने जर आपण बघितले तर नुकतीच लॉन्च झालेली नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 व तिला स्पर्धा देऊ शकेल अशी दुसरी बाजारातील महत्वाची बाईक बघितली तर ती जावा 350 आहे. जावा तीनशे पन्नास या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आलेली होती.
त्यामुळे आपल्याला बाजारपेठेत क्लासिक 350 आणि जावा 350 यांच्यामध्ये स्पर्धा दिसून येते. त्यामुळे आपण या दृष्टिकोनातून या दोन्ही बाइक मधील फरक नेमका काय आहे आणि वैशिष्ट्ये काय आहेत? याबद्दलची माहिती अगदी थोडक्यात बघू.
काय आहेत दोघे बाईकमध्ये वैशिष्ट्ये?
1- नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350- या बाईक मध्ये कंपनीने टेलिस्कोपिक फॉर्क्स, ड्युअल रियर शॉक तसेच अलोय आणि स्पोक्ड व्हील पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय दिला आहे.
तसेच ड्युअल चॅनल ABS( टॉप वेरिएंट), एलईडी हेडलाईट आणि इंडिकेटर्स दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक, लहान आकाराच्या डिजिटल सह अनलॉग स्पीडोमीटर देण्यात आलेले आहे. इतकेच नाहीतर गिअर पोझिशन इंडिकेटर, ऍडजेस्टेबल लिव्हर्स आणि नेवीगेशनसह रीड आउट देखील दिलेले आहे.
2- जावा 350- जावा 350 मध्ये सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सेटअप च्या बाबतीत सारखे वैशिष्ट्ये दिले आहेत व यात अनलॉग मीटर आणि फ्युएल गेज आहे. या बाईकमध्ये हॅलोजन लाईट साठी सेटल आहे आणि जुन्या क्लासिक मॉडेल प्रमाणे ड्युअल एक्झॉस्ट देण्यात आला आहे.
दोन्ही मोटरसायकली मध्ये जर तुलना केली तर रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 अधिक सुसज्ज आहे परंतु जावा 350 तिचा ओल्ड कूल फील ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे.
कसे आहे दोघे बाईकचे इंजिन?
क्लासिक 350 बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्सची जोडलेले J सिरीज एअर कुल्ड सिंगल सिलेंडर इंजन आहे. तर जावा 350 चे इंजिन हे सहा स्पीड गिअरबॉक्सने जोडलेले थोडेसे आधुनिक लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे.
या दोघी बाईक पैकी जावा 350 मध्ये अधिक पावर आणि टॉर्क असल्याची खात्री आपल्याला कागदावर मिळू शकते. परंतु रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 रेव्ह रेंजमध्ये खूप आधी टॉर्क ऑफर करते. त्यामुळे ती चालवण्यासाठी एक सोपी मोटरसायकल ठरते.
इतर वैशिष्ट्ये
जर आपण रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चा डिस्प्लेसमेंट बघितला तर तो 349 सीसी आहे तर जावा 350 चा ३३४ सीसी आहे. क्लासिक 350 वीस बीएचपीची पावर जनरेट करते तर जावा 350 22 बीएचपीची पावर जनरेट करते.
क्लासिक ३५० २७ एनएमचा टॉर्क जनरेट करते तर जावा 350 28 एनएमचा टॉर्क देते. क्लासिक 350 मध्ये पाच स्पीड गिअर बॉक्स आहे. तर जावा 350 मध्ये सहा स्पीड गिअर बॉक्स आहे.