भरदिवसा गुंडाराज ! नगरमध्ये ताबेमारीसाठी पत्र्याच्या शेडवर जेसीबी, ताबेमारीमागे कुणाचा हात? पहा..

नगर शहरातील, उपनगरातील ताबेमारीचा विषय अत्यंत गहन बनत चालला आहे. भरदिवसा गुंडाराज सुरु असल्याचे चित्र काल (२० ऑगस्ट) सावेडीत दिसले. सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील दहा गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न झाला.

Ahmednagarlive24 office
Published:
tabemari

Ahmednagar News : नगर शहरातील, उपनगरातील ताबेमारीचा विषय अत्यंत गहन बनत चालला आहे. भरदिवसा गुंडाराज सुरु असल्याचे चित्र सावेडीत दिसले.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील दहा गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न झाला. भरदिवसा सात ते आठ जण बुलेट व कारमधून येतात.

जेसीबीच्या सहाय्याने कंपाऊंड तोडून आत प्रवेश करतात. भरदिवसा पत्र्याचे शेडवर जेसीबी चालवित नुकसान करतात. हे चित्र गुंडाराज पेक्षा कमी नाही अशी नागरिकांत चर्चा आहे.

हा प्रकार सावेडी उपनगरातील डीमार्ट मॉल परिसरात सोमवारी (दि. १९) दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी मयुर राजेंद्र कटारिया (रा. रामचंद्र खुंट) मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात ते आठ व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यांचे रामचंद्र खुंट परिसरात सोन्याचे दुकान आहे. फिर्यादीचे आजोबा नतमल प्रेमराज कटारिया व त्यांचे मित्र सोमनाथ शामराव देवळालीकर यांनी १९८४ मध्ये नगर- मनमाड रोडवरील पद्मावती पेट्रोलपंपासमोर डीमार्ट चौकात १० गुंठे जमीन खरेदी केलेली आहे.

फिर्यादीचे अजोबा नतमल यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्या जमिनीशेजारी मन्नु शेरा कुकरेजा, भरत कुकरेजा, राजेश कुकरेजा यांची जमीन आहे. त्यांच्याकडून फिर्यादीच्या जमिनीवर वारंवार अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याने २०२३ मध्ये मोजणी करून पत्र्याचे कंपाऊंट केले.

येथे सीसीटीव्ही बसवून व्यवसायाकरीता दोन पत्र्याचे शेड उभे केले. सुरक्षेसाठी दोघांची नियुक्ती केली. सोमवारी दुपारी अनोळखी सात ते आठ व्यक्तींनी फिर्यादी यांच्या जमिनीवर येत कंपाऊंड, पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही व इतर साहित्याचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

‘ताबेमारी’ने व्यावसायिकांत भिती
यापूर्वीही कल्याण रोडवरील एका मोक्याच्या जागेवर ताबा घेतल्याची घटना घडली होती. तसेच सावेडी, बोल्हेगाव परिसरात ताबेमारीच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वतावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe