Tata Stock :- शेअर्स मार्केट हा एक गुंतवणुकीचा असा पर्याय आहे त्यामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास करून आणि संपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने जर प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञांच्या सहाय्याने किंवा मार्गदर्शनाने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर नक्कीच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई करता येणे शक्य आहे.
परंतु चुकीच्या पद्धतीने जर यामध्ये गुंतवणूक केली तर एका झटक्यामध्ये कंगाल होण्याची देखील शक्यता मोठी असते. जर आपण शेअर्स मार्केटचा विचार केला तर देशातील ज्या काही प्रमुख कंपन्या उच्च स्थानी आहेत त्यामध्ये एक टाटा समूह आहे.
शेअर बाजारामध्ये टाटा समूहाच्या अनेक कंपन्या लिस्टेड आहेत व गुंतवणूकदारांनी आजपर्यंत या कंपनीच्या स्टॉक्स मधून खूप मोठ्या प्रमाणावर कमाई केलेली आहे.
पद्धतीने जर आपण टाटा समूहाचा व्होल्टास या स्टॉकची माहिती घेतली तर हा देखील एक टाटा समूहाचा महत्त्वपूर्ण स्टॉक असून येणाऱ्या कालावधीत गुंतवणूकदारांना चांगली कमाई करण्याचे संधी देऊ शकतो.
टाटाच्या व्होल्टास या स्टॉकवर ब्रोकरेज आहेत फिदा
वोल्टास हा टाटा समूहाचा एक महत्त्वपूर्ण स्टॉक असून येणाऱ्या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना उत्तम कमाई करण्याची संधी या माध्यमातून मिळू शकते. सध्या या स्टॉक्सवर अनेक ब्रोकरेज उत्साही असल्याचे दिसून येत असून त्यांनी देखील हा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे.
सोमवारी टाटा समूहाच्या या स्टॉकने 1611.70 रुपयांची उच्च पातळी गाठलेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकला 1960 पर्यंत टारगेट दिले असून जे शुक्रवारच्या बंद किमतीच्या तुलनेमध्ये 30 टक्के जास्त आहे.
तसेच ब्रोकरेज जेफरिजच्या माध्यमातून देखील याकरिता सकारात्मक भूमिका ठेवत टाटा समूहाच्या या शेअर्सला बाय रेटिंग दिलेले आहे व टारगेट प्राईज १७७० रुपये पर्यंत वाढवली आहे व ती शुक्रवारच्या बंद किमतीपेक्षा 15% जास्त आहे.
इतकेच नाहीतर नोमुराने देखील या शेअर्सवर 1857 रुपये टारगेट दिले असून यूबीएसने देखील 1960 रुपयांचे टार्गेट ठेवलेले आहे.
व्होल्टासने पंचवीस वर्षात दिला गुंतवणूकदारांना इतका परतावा
टाटा समूहाचा व्होल्टास हा स्टॉक एका महिन्यामध्ये तब्बल दुपटीने वाढला असून मागील पंचवीस वर्षाची तुलना केली तर या शेअर्सने गुंतवणूकदारांना 12000 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर 1999 मध्ये या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आज 12,007,462 रुपये झाले असते व तुम्ही करोडपती बनला असता. 1999 च्या जानेवारी महिन्यामध्ये या शेअरची किंमत 13 रुपये 40 पैसे होती.
मागील एकच महिन्यात टाटा कंपनीचा हा स्टॉक 6% नी वधारला व सहा महिन्यात 44 टक्क्यांनी तेजी नोंदवली. यावर्षी 2024 मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या स्टॉक्सने 65% चा फायदा करून दिलेला आहे.
( टीप- तुम्हाला जर शेअर्स मार्केट किंवा कुठल्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही प्रमाणित अशा गुंतवणुक सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुमचा नफा किंवा तोट्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.)