अहमदनगर ब्रेकिंग : दोन शिक्षकांपाठोपाठ ‘त्या’ चहा विक्रेत्यानेही केली आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय ७५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली.

बेलापूर रोडलगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी आत्महत्या केली.

कोरोनामुळे दर शुक्रवारी संपूर्ण गावात जनता कर्फ्यू असतो. त्यामुळे ही घटना घडूनही सर्व दुकाने बंद असल्याने कुणाच्या लक्षात आली नाही.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी येऊन तांदळे यांचा मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात नेला.

गेल्या महिन्यात एका शिक्षकाने सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. आठ दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले.

त्यापाठोपाठ चहा व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. कोल्हारमध्ये आत्महत्येचे सत्रच सुरू झाले असल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment