यंदा गव्हाच्या ‘ह्या’ वाणाची लागवड केले तर प्रतिक्विंटल मिळेल भरघोस उत्पादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद  नवी दिल्ली येथे पिकांच्या १०९ नवीन वानांची लॉन्चिंग केली व यामध्ये गव्हाच्या एचआय 1665 या जातीचा देखील समावेश करण्यात आला होता व याशिवाय गव्हाची एचआय 8840 या वाणाची देखील लॉन्चिंग करण्यात आली

Ajay Patil
Updated:

रब्बी हंगामातील गहू हे सगळ्यात प्रमुख पीक असून संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जाते. भारतामध्ये गव्हाची मागणी जास्त असल्याने गव्हाचे उत्पादन वाढावे याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला जात असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील करण्यात येत आहे.

तसेच काही वर्षांपासून उष्णतेचे वाढलेले प्रमाण आणि प्रतिकूल हवामानाची स्थिती यामुळे गव्हाची लागवड आणि उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होत असून उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट येत आहे. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गव्हावर सातत्याने संशोधन केले जात असून त्याचे नवनवीन वाण विकसित केले जात आहेत.

काही दिवसाअगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद  नवी दिल्ली येथे पिकांच्या १०९ नवीन वानांची लॉन्चिंग केली व यामध्ये गव्हाच्या एचआय 1665 या जातीचा देखील समावेश करण्यात आला होता व याशिवाय गव्हाची एचआय 8840 या वाणाची देखील लॉन्चिंग करण्यात आली व या दोन्ही गव्हाच्या जाती आयसीएआर इंदूरने विकसित केलेले आहेत.

 आयसीएआर इंदूरने तयार केले गव्हाचे हे वाण

HI 1665 ही गव्हाची जात भारतीय कृषी संशोधन संस्था, प्रादेशिक केंद्र इंदूर यांनी विकसित केले असून हे वाण तयार करण्यासाठी शरबती या लोकप्रिय वरायटीचे एचआय 1531 म्हणजेच हर्षिता आणि एचआय 1544 म्हणजेच पूर्णा या जातींच्या माध्यमातून हा वाण तयार करण्यात आलेला आहे.

विकसित करण्यात आलेल्या HI 1655 या गव्हाच्या जातीची शिफारस मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान तसेच उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे. ही उच्च उत्पन्न देणारे शरबती गावाची जात आहे.

 प्रतिक्विंटल मिळू शकते इतके उत्पादन

मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की एचआय जातीची लागवड करून शेतकरी प्रति हेक्टर सरासरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळवू शकतात व त्याचबरोबर योग्य पाण्याचे व्यवस्थापन तसेच माती व वातावरण उपलब्ध असल्यास उत्पादनात आणखी वाढ होऊ शकते व शेतकरी 45 ते 50 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळवू शकतात.

गव्हाची ही जात मध्यम कालावधीची असून पेरणी केल्यानंतर 110 ते 115 दिवसात ती काढणीस तयार होते व 85 ते 90 सेंटीमीटर पर्यंत वाढते. कमीत कमी दोनदा सिंचनाची व्यवस्था असेल तरी देखील या जातीपासून चांगले उत्पादन मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe