Ahmednagar News : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांची स्वतःची गाडी लावतात, त्या ठिकाणी दुसऱ्याची गाडी लागली गेली. महाराष्ट्र शासन असा त्या गाडीवर उल्लेख होता.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे जेवण झाल्यावर परत आल्यानंतर त्यांना या ठिकाणी गाडी दिसली, त्यांनी ती गाडी बाजूला करण्यास सांगितली मात्र संबंधित चालकाने त्यास नकार दिला.
त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत गाडी काढण्यास सांगितले व त्याच्याकडे काही माहिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या चालकांकडे लायसनसुद्धा नव्हते व त्यांनी उद्धटपणे उत्तरे दिली.
त्यांनी त्या गाडीमध्ये बसणाऱ्यांची चौकशी केल्यावर त्यामध्ये एक तोतया पत्रकार असल्याचे सुद्धा आढळून आले. त्यांनी त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांची चांगलीच धांदल उडाली.
तेथील अधिकाऱ्यांनी तात्काळ वाहतूक शाखेला या संदर्भातील माहिती दिली. वाहतूक शाखेतीला काहींनी अगोदर आमच्याकडे थेट साहित्य नाही किंवा गाडी टोचन नेण्यासाठी वाहन नाही, असे सांगितले.
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आपण अगोदर कारवाई करा, असे सूचित केल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले व त्यांनी संबंधित गाडीचालकाची चौकशी केल्यानंतर त्यांना या ठिकाणी संबंधित चालकाकडे लायसन नसल्याचे लक्षात आले.
कागदपत्रे नसल्यामुळे वाहतूक शाखेने त्यांना दंड ठोठावला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेमध्ये येऊन अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या संबंधिताला दंडाची शिक्षा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेमध्ये गाडी लावून नियमांचे उल्लंघन उद्धटपणे वागणूक देणाऱ्याला चांगली चपराक बसली असून, संबंधित चालकाला दंड भरण्याची वेळ येऊन ठेपली.