Kokan Expressway:- महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांची कामे सध्या सुरू आहेत व काही महामार्गाची कामे हे प्रस्तावित आहेत. राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमधील असलेली कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून व त्यासोबतच कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला हातभार लागावा याकरिता या एक्सप्रेस वे चे महत्व अनन्यसाधारण असणार आहे.
अगदी या अनुषंगाने जर आपण गोवा या राज्याचा विचार केला तर हे एक पर्यटनासाठी समृद्ध असे राज्य असून महाराष्ट्रातून आणि खास करून मुंबईतून गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.
या पार्श्वभूमीवर आता मुंबई ते गोवा या दोन राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन एक्सप्रेस वे बांधण्याची योजना आखण्यात आलेली असून कोकण द्रुतगती मार्गाच्या नावाने हा एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे. हा नवीन एक्सप्रेस वे सहा लेनचा असणार आहे व मुंबई- गोवा दरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ जवळपास निम्म्यावर येणार आहे.
उभारला जाणार मुंबई ते गोवा द्रुतगती महामार्ग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सरकार मुंबई ते गोवा या दोन राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याकरिता नवीन एक्सप्रेस वे बांधण्याची योजना आखत असून हा सहा लेन असलेला नवीन महामार्ग मुंबई ते गोवा दरम्यानचा लागणारा वेळ जवळपास अर्ध्यावर आणणार आहे.
376 किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती मार्ग हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग असणार असून यामुळे मुंबई ते गोव्या दरम्यानचा प्रवास करण्यासाठी लागणारे अंतर 12 ते 13 तासांवरून केवळ सात तासांवर येण्यास मदत होणार आहे. कोकणातून जाणाऱ्या या एक्सप्रेसवेला अनेक डोंगर, नदी नाले ओलांडावे लागणार आहेत.
सध्या या महामार्गाच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे व या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रासाठी एक गेम चेंजर ठरणार आहेस. परंतु मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी व या क्षेत्राच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
या एक्सप्रेस वे मुळे पर्यटनाला चालना मिळेलच व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होण्यास मदत होईल.
कसे आहे या महामार्गाचे स्वरूप?
हा दृतगती महामार्ग एकूण 376 किलोमीटर लांबीचा असणार असून हा सहा लेन एक्सप्रेस वे पनवेल ते रायगड आणि रत्नागिरी मार्गे सिंधुदुर्ग कडे जाईल. या द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी लागणारा खर्च हा 68 हजार कोटी रुपये इतका आहे. इतकेच नाहीतर या एक्सप्रेस वे साठी 3792 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
या संपूर्ण एक्सप्रेस वे वर 14 इटरचेंज बांधले जातील. सध्याच्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे महाराष्ट्र सरकारने कोकण एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा मुंबई ते गोवा महामार्ग 523 किलोमीटर लांबीचा आहे व सध्या या महामार्गाच्या विस्तार करण्याचे काम गेल्या तेरा वर्षापासून सुरू आहे.
परंतु अजून पर्यंत ते पूर्ण झालेले नाही. सध्याच्या या महामार्गावर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि प्रवासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा त्रास कमी व्हावा याकरिता सरकारने मुंबई ते गोवा दरम्यान पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.