कुकडीचे पाणी येणार, ‘सीना’ क्षेत्रात ‘इतकी’ आवर्तने मिळणार, शेतकऱ्यांना खुशखबर

अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले त्यानंतर आतापर्यंत पाऊस देखील समाधानकारक पडत गेला. परंतु जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस चांगला झाला असे नाही.

Ahmednagarlive24 office
Published:
sine avrtan

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जोरदार झाले त्यानंतर आतापर्यंत पाऊस देखील समाधानकारक पडत गेला. परंतु जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस चांगला झाला असे नाही.

काही भागात अत्यल्प झाल्याने जिल्ह्यातील काही धरणांमध्येच बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. मिरजगावसह परिसरातील अनेक गावांसाठी वरदान असणारे सीना धरण अद्याप कोरडेच आहे.

सीना धरण पट्टयात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. कुकडीचे पाणी भोसे खिंडीद्वारे सीना धरण्यात सोडण्याची विनंती कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाकडे केली.

भोसे खिंडीतून सीना धरणात हे साडेतीन टीएमसी पाणी येणार असल्याने, सीना धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार आवर्तने मिळणार आहेत.

कर्जत तालुक्यातील सीना धरण २.४० टीएमसीचे आहे. त्यावर निमगाव गांगर्डा, घुमरी, बेलगाव, मिरजगाव, नागलवाडी, नागापूर या गावांसह २८ गावांतील शेतकऱ्यांना वर्षभरात दोन ते तीन आवर्तने सोडली जातात.

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नसल्याने बहुतांश वेळी  धरण कुकडी कालव्यातून भोसे खिंडीमार्गे पाणी आणून भरावे लागते. आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी, प्रशासन आणि जलसंपदा विभागाशी समन्वय साधून, वेळोवेळी पाठपुरावा करून दरवर्षी भोसे खिंडीतून पाणी आणून या २८ गावांना देण्याचा प्रयत्न केला.

गेल्या पाच वर्षांत तब्बल साडेतीन टीएमसी पाणी आणले, ते पूर्वीच्या तुलनेत जवळपास दीड टीएमसीने अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. सीना धरण भरले तर २८ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होतो.

त्यामुळे अधिकारी, प्रशासन आणि जलसंपदा विभागाशी सातत्याने समन्वय साधून आणि पाठपुरावा करून पाणी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात तब्बल साडेतीन टीएमसी पाणी आणता आल्याचे समाधान आहे.

यापुढेही भोसे खिंडीतून अधिकाधिक पाणी आणून मतदारसंघात देण्याचा प्रयत्न राहणार आहे असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe