अभाविपने कार्यकर्तेच नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्याचे काम केले, मंत्री विखे पाटलांचे गौरवोद्गार

75 वर्षाच्या वाटचालीत अभाविपने विचारांच्या आधारावर केवळ कार्यकर्तेच नाही तर व्यक्तिमत्व घडविण्याचे मोठे काम केले आहे. संघटनेचा विचारांचे पाठबळ घेवून कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे गौरवपूर्ण उद्गार महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

75 वर्षाच्या वाटचालीत अभाविपने विचारांच्या आधारावर केवळ कार्यकर्तेच नाही तर व्यक्तिमत्व घडविण्याचे मोठे काम केले आहे. संघटनेचा विचारांचे पाठबळ घेवून कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे गौरवपूर्ण उद्गार महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री बाळकृष्णजी उद्योगपती अरविंद पारगावकर विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र काळे महानगर अध्यक्ष प्रा.मिलींद देशपांडे महानगर मंत्री आनंद गांधी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ जयंत कुलकर्णी जेष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर वनवासी कल्याण आश्रमाचे डॉ आशुतोष माळी प्रा.प्रशांत साठे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भाषणत मंत्री विखे यांनी विद्यार्थी परिषदेच्या पंच्याहतर वर्षाच्या अंखडीत यशस्वी वाटचालीचा गौरव करून युवाशक्ती हीच देशाची शक्ती असल्याने त्याला पाठबळ देण्याशिवाय पर्याय नाही.आजही महाविद्यालयातून कालबाह्य अभ्यासक्रमातून आपण बाहेर पडायला तयार नाही.यावर अधिक काम होण्याची अपेक्षा व्यक्त करून केवळ भावनिक मुद्दे तयार करून युवाशक्तीला भडकावण्याचे काम केले जात असले तरी विचारांची बांधिलकी मानणारा कार्यकर्ताच याला प्रतिउतर देवू शकतो.यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग सातत्याने होण्याची गरज त्यांनी व्यक्त करून यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कश्मिर आंदोलन आक्रमतने होवू शकलै.३७० कलम रद्द करण्यासाठी परीषदेने घेतेला पुढाकार तितकाच महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार काढून संघटनेन निर्माण केलेली विश्वासार्हता आजच्या राजकीय सामाजिक बदललेल्या वातावरणात खूप महत्वपूर्ण असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सहसंघटन मंत्री एस बाळकृष्णन यांनी आपल्या भाषणात सर्वाधिक सदस्य संख्या असलेली संघटना म्हणून आम्हाला अभिमान असून अहील्यानगर येथील कार्यालय जुन्या कार्यकर्त्याच्या समर्पित भावनेने मिळालेली भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe