विखेंसह वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपची बैठक, कर्डिलेंची अनुपस्थिती, बैठकीत गरमागरमी, जिल्हाध्यक्षांची कानउघडणी.. पहा काय घडलं

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात बुथ समिती व बुथ विस्तारासह सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डीत पार पडली.

अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभागीय संघटक अनासपुरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची उपस्थिती या बैठकीस होती. या बैठकीत चांगलीच गरमागरमी झाल्याचे समजले आहे. पक्ष संघटनात्मक कामांमध्ये त्रुटी आढळल्याने पक्षाच्या वरिष्ठांकडून जिल्हाध्यक्षांची कानउघडणी करण्यात आली अशी माहिती समजली आहे.

या बैठकीस पक्षाचे जिल्ह्यातील प्रदेश सदस्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणी, विधानसभा प्रमुख, विधानसभा संयोजक, विधानसभा प्रभारी व विस्तारक यांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी पक्षाचे तिन्ही जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. सुरवातीला उत्तर, त्यानंतर दक्षिण अशी बैठक झाली.

त्यावेळी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तर नगर शहरजिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत विचारणा केली. संघटना वाढीसाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काय नियोजन,पक्षासाठी प्रवास करण्याची सुचना त्यांनी केली.

पक्षासाठी प्रवास करण्याची सुचना त्यांनी केली. निवडणुकीसाठी विधानसभा प्रमुख, विधानसभा संयोजक, विस्तारकांच्या नियुक्ती होऊनही त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही बैठक होणार म्हणून आदल्या दिवशी विधानसभा प्रमुख व संयोजकांची नियुक्ती करण्यात आली.

ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना बैठकीत आपली नियुक्ती झाल्याचे कळले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबति प्रश्न चिन्ह उभे राहिले. त्यातून वरिष्ठांनी जिल्हाध्यक्षांची कानउघडणी केली. जुन्या कार्यकर्त्यांना बैठकांचे निरोप दिले जात नाहीत.

केंद्र व राज्यच्या योजनांच्या माहितीचे फलक उभारले गेले नाहीत, विशेषतः लाडकी बहिण योजनेसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नाही. मागील निवडणुकीत बूथनिहाय मते मिळाली, याबाबत आढावा घेतला गेला नाही.

अशा अनेक त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले. भाजयूमोच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय कर्डिले यांची दोन वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली, मात्र गेल्या २ वर्षात भाजयूमोची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नाही, याबद्दल पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली. मात्र बैठकीला अक्षय कर्डिले उपस्थित नव्हते अशीही माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe