नगरमधील कॅफेत चाललंय काय? कॅफेत बोलवत मुलीवर अत्याचार, ती रडू लागताच..

Ahmednagarlive24 office
Published:
atyachar

Ahmednagar News : सावेडी उपनगरातील कॅफेमध्ये एका युवतीवर तरूणाने अत्याचार केल्याची घटना घडली. नगर शहरात राहणाऱ्या पीडित युवतीने बुधवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

शोएब मोसीन शेख (रा. पंचपीर चावडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी नगरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिची शोएब सोबत ओळख झाली होती.

पुढे त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर शोएबने तिला प्रेम असल्याचे बोलून दाखवले. फिर्यादीने त्याला होकार दिला. दरम्यान, जानेवारी- फेब्रुवारीमध्ये शोएबने फिर्यादीला सावेडीतील एका कॅफेत बोलून घेतले.

तेथील केबिनमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराने फिर्यादी रडू लागली. ‘तू हा प्रकार कोणाला सांगितल्यास मी तुला व तुझ्या भावाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. फिर्यादी घाबरल्याने त्यांनी कोणाला काही सांगितले नाही.

त्यानंतरही शोएब फिर्यादीला फोन करून भेटण्यासाठी बोलवत होता. मात्र फिर्यादीने त्याचे फोन घेणे बंद केल्याने बुधवारी त्याने पुन्हा धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मागील काही दिवसांत नगरमधील गुन्हेगारी वाढू लागल्याचे चित्र आहे. सावेडी भागात असणाऱ्या कॅफेत अश्लील प्रकार सुरु असल्याच्या चर्चाही नेहमी होत असतात.

मागील काही दिवसांत पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत कारवाया देखील केलेल्या आहेत. अशा प्रवृत्तीचा नायनाट पोलिसांनी करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, सदर प्रकरणी शोएब मोसीन शेख (रा. पंचपीर चावडी) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe