अहमदनगरमधील ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी ! तुमच्या ग्रामपंचायतीस किती निधी ? पहा..

अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायती विधानसभेच्या आधीच मालामाल झाल्यात. जिल्ह्यातील जवळपास १३९१ ग्रामपंचायतींना तब्बल ४५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
grampnchayt

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायती विधानसभेच्या आधीच मालामाल झाल्यात. जिल्ह्यातील जवळपास १३९१ ग्रामपंचायतींना तब्बल ४५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

ग्रामीण जनतेच्या सोयीसुविधांसाठी १५ व्या वित्त आयोगातून या निधीचे वाटप करण्यात आलेय. आता या निधीमधून ग्रामपंचायतींना गावाचा विकास करता येणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारातून ग्रामीण विकासासाठी पाणीपुरवठा व स्वच्छताच्या कामांसाठी बंधित तर मागासवर्ग कल्याण, आरोग्य, शिक्षण उपजीविका इत्यादी कामांसाठी अबंधित म्हणून निधी वाटप केला जातो.

सन २०२१-२२ मधील बंधितचा दुसरा हप्ता रोखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा टप्पा मिळावा, अशी ग्रामपंचायतींची मागणी होती.

जिल्हा परिषदेतूनही याचा पाठपुरावा करण्यात आला होता. नुकताच हा दुसरा टप्पाही प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील १३२१ ग्रामपंचायतींना ९ कोटी ४० लाखांचा हा निधी मिळाला आहे.

यातून पाणीपुरवठा व स्वच्छतेची कामे करणे बंधनकारक असतील. तर २०२४-२५ मधील अबंधित निधीचा पहिला हप्ताही शासनाकडून सोबतच वर्ग करण्यात आलेला आहे. यातून १२४९ ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ३५ कोटी ८२ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीमुळे खळखळाट होणार आहे.

कोणत्या ग्रामपंचायतींना किती मिळाला निधी
श्रीरामपूर २०.५० कोटी रुपये, पाथर्डी २४.८५ कोटी रुपये, अकोले २८.५० कोटी रुपये, संगमनेर ४४.५६ कोटी रुपये, कोपरगाव २४.११ कोटी रुपये, राहाता २८.४७ कोटी रुपये,नेवासा ३२.०२ कोटी रुपये

शेवगाव २१.६० कोटी रुपये, राहुरी २६.७० कोटी रुपये, जामखेड १२.२३ कोटी रुपये, कर्जत १८.३८ कोटी रुपये, श्रीगोंदे २९.२८ कोटी रुपये, पारनेर २७.५१ कोटी रुपये, नगर ३०.१० कोटी कोटी रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe