आनंदाच्या शिध्यात आता ‘या’ चारच वस्तू, मैदा, पोहे गायब !

महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठीही अनेक योजना आणल्या. या पैकी एक म्हणजे आनंदाचा शिधा. महायुतीच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी ही एक महत्वाची योजना. शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळत आहे.

Published on -

Ahmednagar News : महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठीही अनेक योजना आणल्या. या पैकी एक म्हणजे आनंदाचा शिधा. महायुतीच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी ही एक महत्वाची योजना. शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळत आहे.

अहमदनगरचा विचार केला तर अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे ७ लाख २४ हजार ५२० शिधापत्रिकाधारक असून २९ लाख ३६ हजार ७०७ लाभार्थी आहेत.

२०२२ च्या दिवाळीपासून राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. रामजन्मभूमी सोहळा व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा देण्यात आला.

त्यानंतर गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी आदी सणालाही शिधा देण्यात आला.

आता सहा ऐवजी चार वस्तू
राज्य सरकारने गौरी- गणपती सणासाठी आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. परंतु, यावेळी शिधा संचातून मैदा आणि पोहे गायब झाले असून सहाऐवजी चार वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

गौरी-गणपती सणासाठी यंदा ६ लाख ५४ हजार ५४४ संच मंजूर झाले असून यासाठी ५६२ कोटी ५१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली होती. शिधा संच ई-पॉस प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

२०२२ च्या दिवाळीपासून राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. यात रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंचा संच १०० रुपयांत देण्यात आला होता.

यानंतर रामजन्मभूमी सोहळा व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या शिध्यामध्ये मैदा व पोह्यांचा समावेश करण्यात आला होता. मैदा व पोहे या दोन वस्तूंत वाढ करताना अन्य रवा व चणाडाळ या दोन वस्तूंचे वजन एक किलोवरून अर्धा किलोवर घटविले. मात्र, आता पुन्हा वस्तूंची संख्या सहावरून चार करण्यात आल्याची माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe