५३ लाखांच्या गुटखाप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे मंगळवारी पोलिसांनी सुमारे ५३ लाख ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरात कलिम सय्यद यांचे शेतातील पत्र्याच्या गोडावूनमध्ये आयशर कंपनीचा टेम्पो (जीए ०७ एफ ३१००) व अशोक लेलंड कंपनीच्या

छोटा टेम्पोतून (एमएच १८ बीवाय ३०८३) अवैधरित्या गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखू आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकली असता घटनास्थळी ३७ लाख १२ हजार किमतीचा हिरा पानमसाला,

९ लाख ४२ हजारांची रॉयल सुगंधी तंबाखू आढळली. ७ लाख रुपयांची दोन वाहने जप्त करण्यात आली. सलमान ऊर्फ इरफान शब्बीर तांबोळी (वय ३०, नवलेगल्ली, बेलापूर) व निमगाव येथील वैभव चोपडा व साहिल चोपडा,

लोणी येथून फिरोज पठाण या चार आरोपींना १० पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करून अन्य फरार आरोपिंचा शोध घेणे,

ज्याच्या शेडमध्ये हा गुटखा होता त्याचा यात काय हात आहे याचा शोध घेण्यासाठी कोठडीची मुदत वाढवून मिळावी, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment