तुम्ही दहावी व आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुमच्या करिता खूप मोठी आनंदाची बातमी असून महापारेषण कंपनीच्या माध्यमातून वीजतंत्री अर्थात वायरमन या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे व याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही देखील महापारेषण मध्ये भरतीची वाट पाहत असाल तर याकरिता तुम्ही पटकन अर्ज करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड( सातारा) अंतर्गत शिकाऊ उमेदवार( वीजतंत्री अर्थात वायरमन) पदांच्या एकूण 39 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत व त्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

महापारेषणमध्ये होणार वीजतंत्री म्हणजेच वायरमन पदांच्या एकूण 39 रिक्त जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड जिल्हा सातारा अंतर्गत वीजतंत्री( शिकाऊ उमेदवार ) त्यांच्या एकूण 39 जागा रिक्त आहेत व या 39 रिक्त जागा भरण्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी पटापट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घेणे खूप महत्त्वाचे आहे. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदाच्या 39 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे महत्त्वाचे असणार आहे.
काय आहे वयोमर्यादा?
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड( सातारा) अंतर्गत विजतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले असून याकरिता वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्ष इतकी निश्चित करण्यात आलेली आहे व महत्त्वाचे म्हणजे मागासवर्गीयांकरिता पाच वर्षे वयात शिथिलता देण्यात आलेली आहे.
काय आहे शैक्षणिक पात्रता?
महापारेषणच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शिकाऊ उमेदवार( वीजतंत्री) या पदाच्या भरतीकरिता जे उमेदवार अर्ज करतील ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच एनसीटीव्हीटी म्हणजेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना कुठे करावी लागेल नोकरी?
या भरती प्रक्रियेमध्ये ज्या शिकाऊ उमेदवार( वीजतंत्री) पदासाठी निवड केली जाईल त्यांचे नोकरीचे ठिकाण हे कराड जिल्हा सातारा हे असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
महापारेषण च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही…
https://www.apprenticeshipindia.gov.in या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
विजतंत्री( शिकाऊ उमेदवार) पदासाठी तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 17 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज सादर करू शकतात व ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.