सणासुदीचा कालावधी आणि या सणांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या शुभ मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी करणे हे गेल्या कित्येक वर्षापासून खूप मोठी परंपरा भारतात आहे. शुभ मुहूर्तावर नवीन वाहन घरी आणणे हे एक विशेष समजले जाते. त्यामुळे अशा कालावधीत नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे या कालावधीत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून देखील अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेली वाहने लॉन्च करण्यात येतात. याचप्रमाणे टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनीने देखील नवीन एसयूव्ही टाटा कर्व कुपे लॉन्च केले असून या कारमध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे टाटा मोटर्सने ही कर्व कुपे एसयूव्ही मॉडेल तब्बल आठ वेरियंट आणि सहा रंगांमध्ये उपलब्ध केलेली आहे.
कशी आहे या कारचे डिझाईन आणि वैशिष्ट्ये?
जर आपण या टाटाच्या कर्व कुपे एसयूव्हीचे डिझाईन पाहिले तर या कारच्या हायलाइट्स मध्ये पुढील आणि मागील बाजूला एलइडी लाईट बार, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प तसेच ड्युअल टोन आलोय व्हिल्स, फ्लश फिटिंग डोअर हँडल तसेच ब्लॅक आउट ओआरव्हीएम, एल आकाराचे उलटे एलईडी टेललाईट इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे व इतकेच नाहीतर यामध्ये शार्क फिन अँटेना देखील देण्यात आला आहे.
हे आहेत महत्त्वाचे फीचर्स
या कारच्या मधल्या भागामध्ये पॅनोरेमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, 12.3 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक तसेच टाटाचा लोगो व त्यासह चार स्पोक स्टेअरिंग हिल्स देण्यात आलेली आहे. तसेच कारच्या पुढे एसी फंक्शन्स व 360 डिग्री कॅमेरा,
पुढचे पार्किंग सेन्सर्स तसेच डॅशबोर्डसाठी फॉक्स कार्बन फायबर फिनिश, ड्राईव्ह मोडस, रियर एसी व्हेट्स, पावर टेलगेट, वायरलेस चार्जर, सिक्स वे पावर ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट व त्यासाठी टच कंट्रोल सुद्धा दिले जाणार आहे. मागील बाजूचे सीट आरसी लाईन फंक्शन, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन, ॲम्बीअंट लाइटिंग इत्यादी वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत.
कसे आहे या कारचे इंजिन?
टाटा कर्व कुपे एसयूव्हीमध्ये कंपनीने 1.2- लिटर GDi टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल या तीन इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. इतकेच नाहीतर या कारमध्ये सहा स्पीड मॅन्युअल व डीसीटी युनिट समाविष्ट करण्यात आला आहे. कारमधील नवीन GDi मोटर 123 बीएचपी व 225 nm चा टॉर्क जनरेट करते. हे सगळे फीचर्स पाहिले तर ही कार कुटुंबासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.
किती आहे या कारची किंमत?
ही कार कंपनीने आठ व्हेरियंट व 6 रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केली असून या कारची किंमत फक्त दहा लाखांपासून सुरू होणार आहे व ही किंमत 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी केलेल्या बुकिंग वर लागू होईल अशी देखील माहिती समोर आलेली आहे.