सणासुदीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये उत्तम असा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सॅमसंगने एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. कारण नुकताच सॅमसंग ने आपल्या A- सिरीजचा नवीनतम बजेट स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला असून त्याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी AO6 असे असून हा फोन कमीत कमी किमतीमध्ये उत्तम वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन आहे.
हा स्मार्टफोन कंपनीच्या सॅमसंग गॅलेक्सी AO5 चा अपग्रेड केलेला प्रकार असून यामध्ये अनेक नवीनतम वैशिष्ट्य देण्यात आलेली आहे. उदाहरणच घ्यायचे तर या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G85 चिपसेट तसेच 6.7 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे व बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे.
Samsung Galaxy AO6 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला असून या हँडसेटमध्ये चार जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलेले आहे. इतकेच नाही तर मायक्रो एसडी कार्डद्वारे हे स्टोरेज एक टीबी पर्यंत वाढवता येणे शक्य आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हिलिओ G85 चिपसेट आहे.
तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा एचडी PLS LCD स्क्रीन देण्यात आला आहे व अँड्रॉइड 14 वर आधारित वन UI 6 सह हा फोन येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करीता या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच फोनच्या सुरक्षा करिता फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
तसेच बॅटरीच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे व जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये डिवाइस ड्युअल सिम पोर्ट तसेच वायफाय, ब्लूटूथ 5.3, GPS,3.5 मीमीचा हेडफोन जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आलेला आहे. स्मार्टफोनचे वजन 189 ग्रॅम असून तो खूप हलका आहे.
किती आहे सॅमसंग गॅलेक्सी AO6 स्मार्टफोनची किंमत?
या स्मार्टफोनच्या चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. तर चार जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11499 रुपये आहे.
तुम्हाला जर हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आला असून यामध्ये काळा तसेच सोनेरी आणि हलक्या निळ्या रंगाचा पर्याय उपलब्ध आहे.