भारतीय कार बाजारपेठेमध्ये सेडान सेगमेंटच्या कारला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेडान सेगमेंटमध्ये अनेक कार लॉन्च केलेल्या आहेत व यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाज, मारुती सुझुकी डिजायर आणि स्कोडा स्लॅविया या कारचे उदाहरण घेता येईल.
या सणासुदीच्या कालावधीमध्ये तुम्हाला देखील जर नवीन सेडान सेगमेंट मधील कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्युंदाई व्हरना(Hyundai Verna) विकत घेऊ शकतात. यामागील कारण म्हणजे या कारच्या खरेदीवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांची तुम्ही बचत करू शकणार आहात.

Hyundai Verna खरेदी केल्यावर किती मिळेल सूट?
तुम्ही जर ही कार खरेदी केली तर त्यावर तुम्ही जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांची बचत करू शकणार आहेत. याबाबत न्यूज वेबसाईट ऑटो कार इंडियावर प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेतला तर त्या बातमीनुसार कंपनीच्या या ऑफरमध्ये 25 हजार रुपयांची रोख सुट,
वीस हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पन्नास हजार रुपयांचा स्क्रॅपेज बोनस समाविष्ट करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या कंपनीच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
कसे आहे ह्युंदाई व्हरना कारचे इंजिन?
या कारमध्ये दोन इंजिनचा पर्याय देण्यात आला असून यातील पहिले म्हणजे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 160 बीएचपी पावर आणि 253 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
तसेच दुसरा इंजिन पर्याय पाहिला तर यामध्ये 1.5 लिटर नॅचरल एस्पीरिटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून या कारच्या इंजिनमध्ये ग्राहकांना मॅन्युअल आणि डीसीडी गिअरबॉक्स पर्याय देखील मिळतो. तसेच या कारमध्ये 528 लिटरची बूट स्पेस देण्यात आलेली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात आहेत तगडे वैशिष्ट्ये
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर ह्युंदाई व्हरना या कारच्या इंटरियरमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच 10.25 डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आठ स्पीकर बास साऊंड सिस्टम, एसी करिता स्विच करणे योग्य नियंत्रण तसेच 64 कलर ॲम्बिइंट लाइटिंग,
एअर पुरिफायर व त्यासोबत हवेशीर आणि गरम होणारी फ्रंट सीट इत्यादी महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली असून यामध्ये सिंगल पॅनोरमिक सनरूफ देखील देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, फ्रंट पार्किंग सेन्सर तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, फॉरवर्ड कॉलिजन वार्निंग ब्लाइंड स्पॉट अलर्ट आणि लँड डिपार्चर वार्निंग यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
किती आहे भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत?
Hyundai Verna कारची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत ही 11 लाखापासून ते 17.42 लाखापर्यंत आहे.