अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी कांद्याला मिळतोय ३३०० ते ४००० ‌भाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर शनिवारी झालेल्या लिलावात १ नंबर कांद्याला ३३०० ते ४००० रूपये क्विंटल बाजारभाव मिळाला.

शुक्रवारी राहुरीतील मोंढ्यावर मिळालेल्या बाजारभावाच्या तुलनेत शनिवारी वांबोरीत क्विंटलमागे ४०० ते ५०० रूपयांची वाढ झाली. ३ हजार १९६ गोण्यांची आवक झाली.

एक नंबर कांद्याला ३३०० ते ४००० रूपये, दोन नंबर कांद्याला २६०० ते ३२९५ रूपये, तीन नंबर कांद्याला ४०० ते २५९५ रूपये, तर गोलटी कांद्याला २५०० ते ३१०० रूपये क्विंटल बाजारभाव मिळाला.

शुक्रवारी राहुरीत एक नंबर कांद्याला २९०० ते ३५०० रूपये क्विंटल बाजारभाव मिळाला होता. मोंढ्यावर १५ हजार ९७५ गोणी कांद्याची आवक झाली होती.

दोन नंबर कांद्याला २१०० ते २८९५ रूपये, तीन नंबर कांद्याला ३०० ते २०९५ रूपये, तर गोल्टी कांद्याचा २००० ते ३२०० रूपये क्विंटलने लिलाव झाले. कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!