Ahmednagar News : महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक येथे आधार शेडिंग असल्याने जमा झाले आहेत. परंतू बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चकरा मारून देखील योजनेचे पैसे देण्यास बँक प्रशासनाने नकार दिला आहे.यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तहसीलदार प्रशांत सागडे यांना निवेदन देत लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळावे, अशी मागणी केली आहे.
शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स या बँकेचे कर्ज घेतले होते, त्या कर्जाची वेळेवर परतफेड करत होतो. परंतू करोना काळात अनेक अडचणी आल्याने मोलमजूरी करणाऱ्या महिलांची अडचण झाली.
दरम्यान आमचे आधार कार्ड फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडे लिंक आहे. यामुळे राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेचे पैसे याठिकाणी जमा झाले आहेत. परंतू बँकेचे कर्ज थकीत असे असे कारण सांगत बँक प्रशासनाने आमचे पैसे देण्यास नकार दिला आहे.
यामुळे संबंधीत बँकेवर कारवाई करावी व लाडक्या बहिणी योजनेचे योजनेचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर राणी गरड, गोदावरी क्षीरसागर, जनाबाई गरड, कांताबाई क्षीरसागर, मीनाबाई गरड, सुरेखा गरड, अर्चना बोरुडे, यमुना काकडे, शांताबाई बोरुडे, रुक्मिणी काकडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.