अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राज्यातले हे सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात
अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय कधी मिळणार सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार, एक महिना झाला पण हे सरकार काहीही करत नाही.

हे सरकार कोविड बाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिला वरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा असे विजय वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला विचारावे,
चालणार आहे का असे झाले तर गावो गाव संघर्ष होतील असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसेच राज्यात लवकरच भाजपच सरकार येईल या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नडा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे पाटील म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved