Bank Recruitment 2024:- सध्या शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून यामध्ये बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेकरिता नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. आज आपण पाहतो की, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक तरुण-तरुणी बँकिंग क्षेत्राच्या परीक्षांची तयारी करतात व बँकिंग क्षेत्रातील निघणाऱ्या भरतीकडे या तरुणांचे लक्ष असते.
अगदी याच प्रमाणे तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून देशातील महत्त्वाचे असलेले आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून मॅनेजर या पदावर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून एकूण वेगवेगळ्या 56 पदांसाठीच्या रिक्त जागांवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
आयडीबीआय बँकेकडून असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील महत्त्वाची असलेल्या आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदाच्या एकूण 56 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याकरिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे.
कोणत्या पदाचे आहेत किती रिक्त जागा?
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून असिस्टंट जनरल मॅनेजर व मॅनेजर या पदाच्या 56 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून यामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदाचे एकूण 25 पदे रिक्त आहेत.तर मॅनेजर( ग्रेड बी) या पदाच्या एकूण 31 जागा रिक्त आहेत. असे मिळून 56 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय?
तुम्हाला देखील आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या असिस्टंट जनरल मॅनेजर व मॅनेजर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणे गरजेचे आहे.
यामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी भारत सरकारकडून मान्यता असलेल्या कुठल्याही विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. तसेच मॅनेजर या पदाकरिता उमेदवाराचे पदवीपर्यंतचे शिक्षण असणे गरजेचे आहे.
काय आहे आवश्यक वयोमर्यादा?
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय कमीत कमी 28 तर कमाल 40 वर्ष असणे गरजेचे आहे. त्यासोबतच मॅनेजर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे वय हे किमान 25 तर कमाल 35 वर्ष असावे.
कशी केली जाईल उमेदवारांची निवड?
या दोन्ही पदांसाठी बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये निवड करताना उमेदवारांचे वय तसेच त्याचे शिक्षण या क्षेत्रातील कामाचा अनुभव या गोष्टी प्रकर्षाने विचारात घेतल्या जाणार असून त्यानंतर चाळणी केली जाणार आहे.
जे उमेदवार सर्व अटी शर्ती पूर्ण करतील अशा उमेदवारांची पुढील प्रक्रिया करता निवड केली जाईल व त्यानंतर ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत घेऊन योग्य आणि उत्कृष्ट उमेदवार या पदासाठी निवडले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागेल?
तुम्हाला देखील या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा असेल तुम्ही खुला प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला एक हजार रुपये शुल्क यासाठी लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे रुपये शुल्क यासाठी भरावे लागणार आहे.
या भरतीसाठी कुठे करता येईल अर्ज?
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया करिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो idbibank.in संकेतस्थळावरून करू शकतात किंवा या संकेतस्थळावरून अधिकची माहिती घेऊ शकतात.