नगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर! अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये होत आहे नोकर भरती, वाचा या भरतीची ए टू झेड माहिती

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अनुषंगाने बघितले तर या बँकेत देखील आता जवळपास सातशे पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते आज पासून म्हणजेच शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर पासून अर्ज करू शकणार आहेत.

Ajay Patil
Published:
bank bharati

सध्या अनेक शासकीय विभागाच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या जाहिराती काढल्या जात आहेत व यामध्ये बँकिंग क्षेत्रापासून तर रेल्वे विभागाच्या भरत्यांचा आपल्याला समावेश करता येईल. त्यामुळे जे तरुण-तरुणी विविध भरती परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा एक सुवर्णसंधीचा कालावधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अगदी याच अनुषंगाने जर आपण बँकिंग क्षेत्रातील भरतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे

अगदी याचप्रमाणे आपण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अनुषंगाने बघितले तर या बँकेत देखील आता जवळपास सातशे पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते आज पासून म्हणजेच शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर पासून अर्ज करू शकणार आहेत.

 अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये सातशे पदांसाठी नोकर भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये आता संचालक मंडळाची मान्यता घेऊन साधारणपणे सातशे पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून  आजपासून म्हणजेच 13 सप्टेंबर 2024 पासून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने याकरिता अर्ज करता येणार आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या भरती बाबत बघितले तर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यापासून ते राज्य आणि सरकार पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे.त्यासोबतच अनेक विविध बाबींवर शासन तसेच सहकार खात्याच्या यंत्रणा सह राजकीय पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

यामध्ये संचालकांचे मान्यतेने वारेमाप करण्यात येणारा खर्च व त्याशिवाय बँकेचा बिघडलेला कर्जाचा रेशो इत्यादी बाबी खूप चर्चेत आहेत. यामध्येच आता यास भरतीचा विषय समोर आलेला आहे.

बँकेच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यासाठी आता पुणे येथील वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड संचालक मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

या भरतीकरिता बँकेच्या माध्यमातून काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत व कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकेशिवाय परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम होणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा देखील देण्यात आलेला आहे.

 ही रिक्त पदे भरली जाणार आवश्यक शैक्षणिक पात्रता

अहमदनगर जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक पदासाठी 687, वाहन चालक चार आणि सुरक्षारक्षकांच्या पाच जागा रिक्त असून याकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

बँकेच्या लिपिक पदाकरिता उमेदवार हे बीकॉम, एमबीए( बँकिंग/ फायनान्स), एलएलबी, एलएसएम, डीएलटीसी यासह कॉमर्स विभागातील शिक्षणाची अट आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे बँकिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव याकरिता आवश्यक असणार आहे.

 साधारणपणे निवड कशी केली जाईल तीची प्रक्रिया

बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरतीमध्ये जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पास होतील त्यांना दहा गुणांची तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळणार असून निवड झालेल्या लिपिक पदासाठीच्या उमेदवारांना पंधरा हजार तर वाहन चालक सुरक्षारक्षक यांना 12 हजारात मात्र काम करावे लागणार आहे.

यामध्ये परीविक्षाधिन कालावधी असेल व तो पूर्ण केल्यानंतर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना बँकेच्या सेवेत घेण्यात येणार आहे. तसेच त्यांना तीन वर्षे बँकेची नोकरी सोडता येणार नसल्याची हमी देखील द्यावी लागणार आहे. यासाठीची ऑनलाईन परीक्षा होणार असून निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आले तरी देखील नियुक्ती बाबत संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्तीचा हक्क सांगता येणार नसल्याचे देखील यामध्ये लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

यात उमेदवारांच्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरतीमध्ये करण्यात येणाऱ्या पदांमध्ये बदल होण्याची शक्यता देखील असून यावर उमेदवारांच्या तक्रारी ग्राह्य धरता येणार नाहीत व भरती बाबतचे सगळे अधिकार हे बँकेने म्हणजे संचालक मंडळाने राखून ठेवलेले आहेत.

समजा या भरतीच्या पदांबाबत जर काही बदल करण्यात आले तर त्याबाबतची संपूर्ण माहिती या बँकेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते आज शुक्रवारपासून म्हणजेच 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe