श्रीगोंद्यात काका-पुतण्या एकत्र येतील ? कोण होईल आमदार ? ‘ह्या’ नेत्यांचं पारडं आहे जड…

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला पाचपुतेंचं काही खरं नाही, अशा चर्चा रंगल्या. शिवाय, तब्बेत साथ देत नसल्यानं पाचपुतेंना मैदान मारता येईल का, अशा शंकाही उपस्थित केल्या जाऊ लागल्या. यंदा बदल होणार, अशी चर्चा रंगात असतानाच आता पुन्हा वारं फिरल्याचं दिसतंय. प्रतिभा पाचपुते किंवा विक्रमभैय्या पाचपुते हेच आमदार होतील, अशा शक्यता आता येथील राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होऊ लागल्यात. पातपुतेंविषयी एक सहानुभूतीची लाट सध्या तालुक्यात तयार होताना दिसत आहे. या तालुक्याचं राजकीय गणित मांडताना सुरुवातीला या तालुक्यातील इच्छुकांवर एक नजर मारावी लागते. 

Ahmednagarlive24
Published:

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याची ओळख आहे. मात्र तरीही बबनराव पाचपुतेंनी एकहाती खिंड लढवत या तालुक्यात कमळ शाबूत ठेवलंय. सात वेळा, सात चिन्हांवर निवडून येण्याचा पराक्रम पातपुतेंच्या नावावर आहे. यंदाही बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातला आमदार होईल, अशी सर्वात जास्त शक्यता यावेळीही आहे. सर्वात जास्त इच्छुक असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचं राजकारण, दर महिन्याला बदलतं. या तालुक्याने लोकसभेला महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान केलं. निलेश लंकेंना या तालुक्याने विजयी लीड दिलं. असं असलं तरी, आता विधानसभेला हे वारं फिरल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातच आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूतीची सुप्त लाट, सध्या तालुक्यात तयार झाल्याची चर्चा आहे. महायुतीत तीघे व महाविकास आघाडीत तिघे असे तब्बल अर्धा डझन इच्छुक असलेल्या या तालुक्यात यंदा काय होईल..? पातपुते कुटुंबाला तिकीट मिळेल का..? नागवडे अपक्ष लढतील का..? राहुल जगतापांवर शरद पवार पुन्हा विश्वास दाखवतील का..? घनश्याम आण्णा, साजनभैय्या शांत बसतील का..? साजन पाचपुते पुन्हा काकांसोबत येतील का..?  या सगळ्या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

लोकसभेच्या निवडणुकीत मविआच्या निलेश लंके यांना श्रीगोंदा तालुक्यातून 32 हजार 711 मतांची आघाडी मिळाली. पातपुते, नागवडेंसारखे दिग्गज महायुतीत असताना विखेंना या तालुक्याने नाकारले. या तालुक्यात विखेंच्या मागे महायुतीच्या नेत्यांची मोठी गर्दी दिसली. मात्र, नेते एकीकडं आणि कार्यकर्ते दुसरीकडं, या वास्तवामुळं लंकेंना लीड मिळालं. विखेंना फटका बसला. वास्तविक या तालुक्यात निलेश लंकेमागे फक्त राहुल जगताप, घनश्याम शेलार, साजन पातपुतेच दिसले. मात्र तरीही लंकेंनी बाजी मारली. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला पाचपुतेंचं काही खरं नाही, अशा चर्चा रंगल्या. शिवाय, तब्बेत साथ देत नसल्यानं पाचपुतेंना मैदान मारता येईल का, अशा शंकाही उपस्थित केल्या जाऊ लागल्या. यंदा बदल होणार, अशी चर्चा रंगात असतानाच आता पुन्हा वारं फिरल्याचं दिसतंय. प्रतिभा पाचपुते किंवा विक्रमभैय्या पाचपुते हेच आमदार होतील, अशा शक्यता आता येथील राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होऊ लागल्यात. पातपुतेंविषयी एक सहानुभूतीची लाट सध्या तालुक्यात तयार होताना दिसत आहे. या तालुक्याचं राजकीय गणित मांडताना सुरुवातीला या तालुक्यातील इच्छुकांवर एक नजर मारावी लागते.

महायुतीकडून दुसरे इच्छुक नागवडे कुटुंब
पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या नागवडे कुटुंबाने लोकसभेपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी अडचणीत असलेला साखर कारखाना वाचविण्यासाठी नागवडेंनी हा पक्षप्रेवश केला अशा चर्चा रंगल्या. मात्र नागवडेंची विधानसभा लढविण्याची महत्वाकांक्षाही लपून राहिली नाही. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अजित पवारांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याच्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागल्या. मात्र स्टॅडिंग आमदार पाहता या मतदारसंघावर आजही भाजपचा दावा प्रबळ मानला जातोय. त्यामुळे नागवडेंना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता, फारच कमी दिसते. अशावेळी अनुराधा नागवडे, या अपक्ष लढतील अशीही एक शक्यता आहे.

तिसऱ्या इच्छुक आहेत सुवर्णा पाचपुते
पूर्वीपासून भाजपमध्ये असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजपकडून आपण तिकीट मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र बबनराव पाचपुते यांचा अनुभव व राजकीय ताकद पाहता त्यांच्याऐवजी सुवर्णा पाचपुतेंना तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते.

महायुतीतही तिन्ही पक्ष इच्छुक आहेत…

राहुल जगताप
२०१४ ला बबनराव पाचपुतेंचा आश्चर्यकारक पराभव करुन चर्चेत आलेले राहुल जगताप यावेळी पुन्हा निवडणूक लढवतील, असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. जगतापही तसंच म्हणत असले तरी, गेल्या १५ दिवसांपासून तेही पडद्यामागे पडल्याचे चित्र आहे. कारखाना वाचविण्यासाठी त्यांची ताकद खर्च होताना दिसत आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आमदारकीला ते जेवढा विरोध करतील, तेवढा त्यांचा कारखाना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सगळे पाहता, ते सध्यातरी वेट अँण्ड वाँचच्याच भुमिकेत दिसत आहे. मात्र तरी, येथे पाचपुते विरुद्ध जगताप अशाच फाईटची शक्यता सर्वाधिक आहे.

घनश्याम शेलार
घनश्याम शेलार यांचा गेल्यावेळी अगदी थोडक्यात पराभव झाला. बबनराव पाचपुतेंना त्यांनी चांगली फाईट दिली. लोकसभेपूर्वी त्यांनी बीआरएसमधून थेट काँग्रेसमध्ये उडी घेतली. बाळासाहेब थोरातांनी हा पक्षप्रवेश केला. त्यावेळी पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून शेलारांनी विधानसभेचा शब्द घेतल्याच्या चर्चा झाल्या. मात्र मविआत ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. शरद पवार ही जागा सोडतील, अशी शक्यता नगण्य आहे. त्यामुळे आण्णांना यावेळी अपक्ष लढतील का, हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.

साजन पाचपुते
साजन पाचपुते यांनी काकां आ.बबनराव पाचपुतेंसोबत काडीमोड घेत, त्यांच्याविरोधातच दंड थोपाटले. स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती अशा निवडणुकीत त्यांना काकांना थेट टक्कर दिली. आता ते ठाकरे गटातून निवडणुकीची तयारी करत आहेत. मध्यंतरी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनाला आल्यावर खा. संजय राऊतांनी साजन यांचं थेट तिकीटच जाहीर करुन टाकलं. त्यानंतर एकच गदारोळ झाला. कारण ही जागा शरद पवार ठाकरेंना सोडतील का, हा प्रश्न आहे. येथे ठाकरे गटाची ताकदही अत्यल्प आहे. त्यामुळे साजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आता या तालुक्यात, दिवसागणित अजून अनेक ट्विस्ट येण्याचीही शक्यता आहे. बीडमध्ये भाजपने मुंडे घराण्यात समेट घडून आणला होता. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्यानंतरही, त्यांच्यात समझोता झाला होता. तसाच समझोता पाचपुते कुटुंबातही होण्याची शक्यता, काहींजण व्यक्त करताहेत. साजन यांचे वय पाहता, त्यांना भविष्यात अनेक संधी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होतेय. यावेळी बबनराव पाचपुते कुटुंबाला साथ देण्याच्या बदल्यात भाजप साजन यांना भविष्यात वेगळी जबाबदारी देण्याचीही शक्यता आहे. मात्र साजन असं करतील का, हेही सध्या सांगणं कठीण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe