गर्दी वाढल्याने श्रीगोंद्यात कार्यकर्ते अन नेते मंडळी देखील ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र कोण कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे चिन्ह स्पस्ट होत नसल्यामुळे कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहेत.

दरम्यान अनेकजण वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताच निर्णय देण्यात आला नसल्याने कार्यकर्ते अन नेते मंडळी देखील ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

श्रीगोंदा मतदारसंघात श्रीगोंदा शहर आणि पाच जिल्हा परिषद गटासोबत नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांत पहिल्या अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींसह महायुतीच्या नेत्यांना फारसे काही करता आले नाही.

नंतरच्या काळात राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप, शिंदे गटासोबत अजितदादांनी याठिकाणी भरीव निधी दिला. मात्र या मिळलल्या निधीतुन किती व अंदाजपत्रका प्रमाणे गुणवत्तापूर्ण कामे झाली याबाबत कोणीच बोलत नाहीत.

सध्या या मतदारसंघात फक्त विकासकामांची भलीमोठी यादी दिसत असली तरी त्यातील किती कामे योग्य झाली आहेत, याबाबत कोणीच खात्री देत नाही.

सत्तेचा मुकूट डोक्यावर ठेऊन काम करताना करावी लागणारी कसरत तालुक्यातील बहुतांशी प्रमुख नेत्यांनी अनुभवली आहे. मात्र काम करताना छोट्यात छोट्या कार्यकर्त्यांपासून सोबत असलेल्या इतर मित्र पक्ष आणि त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर आपली किती जवळचे संबंध आहेत, यावर राजकीय गणित अवलंबून असतात. तसेच हेच राजकीय गणित निवडणुकीत विजयासाठी उपयुक्त ठरतात.

श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गटाला) मानणारा मतदार संघ मानला जातो. उमेदवार साधा असला तरीही त्याचा विजय अथवा विजयाकडे वाटचाल अनेकांनी पहिली आहे त्यामुळेच आतापर्यन्त अनेक निवडणुकीत राष्ट्रवादीने श्रीगोंद्यात गड राखण्यास यशस्वी झाले आहेत.

मात्र आता परिस्थती बदलली आहे. या मतदारसंघातून महाविकास अगदी व महायुती हे एकमेकांना तोडीस तोड उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या अनेकजण जोरदार तयारी करत आहेत. मात्र अद्याप वरिष्ठांकडून काहीच हालचाली होत नाहीत. त्यामुळे सर्वकाही आलबेल असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe