Ahmednagar Politics: डॉ.सुजय विखे पाटील यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय! मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की सुजय……

डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव होण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी कसोशीने प्रयत्न केले असे म्हटले जाते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना पूर्णपणे मदत करून डॉ. विखे पाटील यांच्या पराभवासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली. याचाच वचपा काढायचा की काय म्हणून आता डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
sujay vikhe patil

Ahmednagar Politics:- महाराष्ट्राच्या राजकारणातील जर आपण कट्टर विरोधक म्हटले तर यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे काँग्रेसचे श्री.बाळासाहेब थोरात यांचे नाव हे आवर्जून नमूद करावी लागते.

हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना देखील एकमेकांवर कुरघोडी किंवा आरोप करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नव्हते व नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता तर हे दोन्ही नेते विरोधी गटात असल्याने एकमेकांना शह देण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण बघितले तर डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव होण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी कसोशीने प्रयत्न केले असे म्हटले जाते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना पूर्णपणे मदत करून डॉ. विखे पाटील यांच्या पराभवासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली. याचाच वचपा काढायचा की काय म्हणून आता डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

डॉ. सुजय विखे निर्णय घ्यायला सक्षम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता व यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवताना म्हटले की तुमच्या मनात सध्या काय आहे? त्याला कुठल्याही पद्धतीने महत्त्व नसून जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच महत्त्वाचे म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, डॉ. सुजय विखे हे निर्णय घ्यायला सक्षम आहेत व त्याला जो निर्णय घ्यायचा तो त्याने घ्यावा.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी जर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयासोबत आम्ही त्याच्या सोबत असल्याचे महत्त्वपूर्ण व सुचक भाष्य देखील त्यांनी केले.

 महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येण्याचा केला दावा

याप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात काय आहे यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केला असून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व आता काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा देखील महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

तसेच यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उपोषणाच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना म्हटले की,उपोषणाला कोणाचा विरोध नाही. त्यांचा तो अधिकार आहे व त्यांच्या मागण्यांचा तसेच धनगर व ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe