गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये गणेशांच्या आगमनामुळे चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरण होते. काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील श्री गणेशाला साश्रू नयनांनी व जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशांमध्ये गणेश विसर्जनाच्या जंगी अशा मिरवणुका देखील आपल्याला पाहायला मिळाल्या.
काही ठिकाणी या गणेश विसर्जनाला मात्र गालबोट लागल्याचे आपल्याला दिसून आले. अशाच प्रकारचे एक विचित्र असे प्रकरण कर्नाटक राज्यातून समोर आले असून या ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन मिरवणूक सुरू असताना दगडफेकीची घटना घडली व त्यानंतर मात्र पोलिसांनी चक्क गणेश मूर्तीला ताब्यात घेतले? त्यामुळे काही काळ पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती होती.
कर्नाटकामध्ये गणेश मूर्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल संपूर्ण देशामध्ये गणेश विसर्जनाच्या उत्साह होता व अनेक ठिकाणी जंगी अशा मिरवणुका निघाल्या होत्या. परंतु या सगळ्या भक्तीमय वातावरणाला मात्र देशातील काही ठिकाणी गालबोट लागल्याचे आपल्याला दिसून आले.
अशाच प्रकारचे गालबोट कर्नाटक राज्यामध्ये लागल्याचे आपल्याला दिसून आले व या ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन मिरवणूक प्रसंगी दगडफिकेची घटना घडली व त्यानंतर मात्र पोलिसांनी चक्क गणेश मूर्ती ताब्यात घडल्याची विचित्र घटना घडली आहे.
पोलिसांच्या या कृतीमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले होते व त्याचे काही प्रमाणात पडसाद महाराष्ट्रातील हिंदू समाजात देखील दिसून आले. विशेष म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये काही घडल्यानंतर चक्क देवाची मूर्ती जप्त केल्याची विचित्र घटना भारतामध्ये प्रथमच पाहायला मिळाली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी नरेंद्र मोदी गणपती आरतीला हजेरी लावल्याने विरोधकांनी उठवले रान
तसेच आपण पाहिले होते की, भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या आरतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. परंतु या सगळ्या घटनेवर देखील काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने सडकून टीका केली होती. यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील देखील अनेक नेत्यांची वक्तव्य पाहायला मिळाली.
या घटनेमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या विश्वासहार्तवर चर्चा सुरू झाल्याचे आपण बघितले. परंतु कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने या काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात घडलेल्या घटनेने मात्र सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चाला ऊत आल्याचे दिसून येत आहे.
नेमकी कर्नाटक मध्ये ही परिस्थिती किंवा ही कारवाई का उद्भवली यावर देखील प्रश्न उपस्थित केला जात असून अशाप्रकारे पूजा किंवा विसर्जन दरम्यान मूर्ती जप्त करणे किंवा तिला घेऊन जाणे चिंताजनक आहे.
सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपती आरतीला हजेरी लावण्याच्या आरोपांवर भाजपाने करून दिली या घटनेची आठवण
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती आरतीला हजेरी लावल्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती.
परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपाने देखील 2009 मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण काँग्रेसला करून दिली. जेव्हा 2009 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार होते व मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी होते. त्यावेळी देशाचे सरन्यायाधीश केजी बालकृष्णन होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी सरकारी निवासस्थानात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते व त्यामध्ये सरन्यायाधीश देखील उपस्थित होते.
त्यामुळे आज सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी करण्यात आलेल्या गणपती आरतीला नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याच्या घटनेवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी सरन्यायाधीश बालकृष्णन यांच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली.
यावर सडकून टीका करताना शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटले की काँग्रेसच्या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या इफ्तार पार्टीला परवानगी आहे परंतु गणेशजींच्या आरतीला नाही.