सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यांचे काय? त्यांचे तर अस्तित्वात काही दिवसात संपणार! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका

राहता तालुक्यातील प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहभागी झाले होते. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Ajay Patil
Published:
vikhe patil

सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण पाहिले तर ते  अनेक दृष्टिकोनातून जरा आपल्याला राज्यातील इतर जिल्ह्याच्या  राजकारणापासून वेगळे दिसून येते.तसे पाहायला गेले तर या ठिकाणी कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये राजकारणाची विरोधाचे किनार रंगताना दिसते.

आता तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर मधूनच शड्डू  ठोकल्याचे जाहीर केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण चूरशीचे होईल असे चित्र दिसून येत आहे.

नुकतेच राहता तालुक्यातील प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहभागी झाले होते. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि खा. संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

 सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्वात येणार संपुष्टात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहता तालुक्यातील प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात काय आहे यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धारच राज्यातील जनतेने केलेला आहे.

त्यामुळे राज्याच्या सत्तेवर येण्याचे महाविकास आघाडीचे जे काही स्वप्न आहे त्या आघाडीचे अस्तित्वच काही दिवसात संपुष्टात येईल. तसेच बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. संजय राऊत यांच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयी जे काही वक्तव्य केले होते त्याची त्यांनी खिल्ली उडवली.

याप्रसंगी ते म्हणाले की, नेमके तुमच्या मनात काय आहे याला काही महत्व नसून जनतेच्या मनात महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार असून महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य ही वैफल्यातून येत आहेत.

महाविकास आघाडीचे अस्तित्व फार दिवसाचे नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले व एवढेच नाही तर मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

 जरांगे पाटील यांच्यावर दिली प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाविषयी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला कोणाचा विरोध नाही व हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या मागण्यांसह राज्यातील धनगर व ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या डॉ. सुजय विखेंच्या निर्णयावर केले भाष्य

नुकतेच डॉक्टर सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे व याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, डॉ. सुजय विखे हे निर्णय घ्यायला सक्षम असून त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा व आम्ही त्यांच्या निर्णयासोबत असल्याचे देखील त्यांनी सूचक वक्तव्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe