Cidco Lottery 2024:- स्वतःचे घर असणे आणि तेही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हे कित्येक लोकांचे एक स्वप्न असते व त्यातल्या त्यात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत असतो. परंतु घरांच्या आणि जागांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकालाच स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणे मात्र शक्य होत नाही.
परंतु या कामी नागरिकांच्या मदतीसाठी गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा आणि सिडको यासारख्या गृहनिर्माण संस्था पुढे येत असतात व या संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्यापैकी मदत होत असते.
सध्या आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या माध्यमातून 2030 घरांसाठीची सोडत प्रक्रियेला सुरुवात झाली असून त्यासंबंधीची आवश्यक प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु आता या दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने सिडकोच्या माध्यमातून देखील घरांसाठीची मोठी लॉटरी काढण्यात येणार आहे व या अंतर्गत तब्बल 40 हजार घरे विकली जाणार असा एक अंदाज असून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही सिडकोची लॉटरी प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
मिळू शकतात परवडणाऱ्या दरात घरे
सिडकोच्या माध्यमातून चाळीस हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे व यामध्ये जर आपण मिळालेली माहितीचा आधार घेतला तर त्यानुसार सिडकोने रेल्वे स्थानकाशेजारी जी काही घरे उभारली आहेत त्याकरिता ही लॉटरी काढण्यात येणार असून येत्या दसऱ्याला ही लॉटरी सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये जे व्यक्ती राहतात त्यांना परवडणारी घरे घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सिडकोच्या माध्यमातून जर बघितले तर जुईनगर,
वाशी तसेच सानपाडा, खांदेश्वर तसेच नेरूळ इत्यादी मोक्याच्या ठिकाणी घरांचे बांधकाम करण्यात आलेले आहे व सिडकोच्या माध्यमातून 67 हजार घरांचे काम सुरू असून त्यातील ४०००० घरांचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या 40000 घरांची लॉटरी आता दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणार आहे.
म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरीमध्ये होईल बऱ्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण
आपल्याला माहित आहे की,म्हाडाच्या माध्यमातून देखील 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती व 19 सप्टेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता.
साधारणपणे पुढच्या महिन्यात या लॉटरीची सोडत जाहीर करण्यात येणार असून म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात या येणारी 2030 घरांसाठीची लॉटरी आणि आता सिडकोने जाहीर केलेली चाळीस हजार घरांसाठीची लॉटरी या दोन्ही सोडत प्रक्रियेमधून बऱ्याच व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.