भारतामध्ये लॉन्च झाली रिहोल्ट RV1 इलेक्ट्रिक बाइक!कराल फुल चार्ज तर धावेल 160 किमी; 499 रुपये टोकन देऊन ऑनलाईन करा बुक

रीहोल्ट मोटर्स या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक बाइक RV1 लॉन्च केली असून ही बाईक कंपनीने RV1 आणि RV1+ अशा दोन प्रकारांमध्ये सादर केलेली आहे.

Ajay Patil
Published:
revolt rv1 electric bike

भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे युग अवतरत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कार उत्पादित केल्या जात असून यासोबतच भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी देखील इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेमध्ये सादर केलेले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि प्रदूषणाची वाढती समस्या या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व खूप मोठे असणार आहे व येणारा कालावधीत इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने जास्त प्रमाणामध्ये धावताना आपल्याला दिसून येतील.

त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येत असल्यामुळे देखील आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल अशी शक्यता आहे.

त्यामुळे भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ ओळखून या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत व अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण रीहोल्ट मोटर्स या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक बाइक RV1 लॉन्च केली असून ही बाईक कंपनीने RV1 आणि RV1+ अशा दोन प्रकारांमध्ये सादर केलेली आहे.

 रिहोल्ट मोटर्सने भारतीय बाजारात लॉन्च केली RV1 इलेक्ट्रिक बाइक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 17 सप्टेंबर 2024 रोजी रिहोल्ट मोटर्सने भारतीय बाजारामध्ये नवीन इलेक्ट्रिक बाइक RV1 लॉन्च केली असून कंपनीने ही नवीन बाईक RV1 आणि RV1+ या दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. कंपनीच्या माध्यमातून ही बाईक परवडणारी कम्प्युटर बाईक पर्याय म्हणून सादर केली असून या बाईकची बुकिंग देखील सध्या सुरू करण्यात आलेली आहे.

तुम्हाला देखील ही बाईक बुक करायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून किंवा या कंपनीच्या डीलरशिपवरून 499 टोकन मनी देऊन ऑनलाइन पद्धतीने देखील बुक करू शकतात.बुक केल्यानंतर साधारणपणे या बाईकची डिलिव्हरी साधारणपणे 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असल्याचे देखील रिहॉल्ट मोटर्स कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे.

 किती आहे या इलेक्ट्रिक बाइकची किंमत

आपल्याला माहित आहे की रिवोल्ट मोटर्स या कंपनीने ही बाईक रिहॉल्ट RV1 आणि RV1+ दोन प्रकारात सादर केली आहे व या दोन प्रकारानुसार जर या बाईकची एक्स शोरूम किंमत पाहिली तर….

1- रिवोल्ट RV1 -या प्रकाराची एक्स शोरूम किंमत 84 हजार 990 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.

2- रिहोल्ट RV1+- या प्रकाराची एक्स शोरूम किंमत कंपनीने 99 हजार 990 रुपये इतकी ठेवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe