Numerology: तुमच्याही मोबाईल नंबरमध्ये आहेत का हे दुहेरी अंक? असतील तर सावधान! नाहीतर….

अंकशास्त्रानुसार बघितले तर नवीन मोबाईल नंबर घेताना आपले शत्रू अंक  कोणते आहेत आणि ते मोबाईल नंबरमध्ये किंवा कुठेही नसता कामा नये याबाबतची माहिती देखील अंकशास्त्रामध्ये दिलेली आहे. त्यामुळे मोबाईल नंबर घेताना देखील अंकांचा विचार करून घेणे खूप गरजेचे असते.

Ajay Patil
Updated:
numerology

Numerology:- भारतीय परंपरेमध्ये ज्योतिष शास्त्र आणि त्या दृष्टिकोनातून निगडित असलेल्या अंकशास्त्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर आज देखील कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ज्योतिष शास्त्राच्या नुसार त्याचा शुभ मुहूर्त पाहून सुरुवात केली जाते.

कारण ग्रह तसेच तार्‍यांचे स्थितीचा जो काही व्यक्तीवर परिणाम होत असतो त्याचा सांगोपांग अभ्यास हा ज्योतिष शास्त्रामध्ये केलेला असतो. अगदी त्याच पद्धतीने अंकशास्त्र देखील खूप महत्त्वाचे असून व्यक्तीच्या जन्मतारखेवरून व्यक्तीचे भविष्य कसे असू शकते किंवा त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असते? याबद्दलची माहिती अंकशास्त्रामध्ये असते.

यामध्ये अनेक प्रकारच्या अंकांच्या बाबतीत देखील व्यक्तीच्या भविष्याशी निगडित असलेल्या संबंध दर्शवलेला असतो. अगदी याच पद्धतीने आपण जो दररोज मोबाईल वापरतो त्यासाठी आपला एक निश्चित असा मोबाईल नंबर असतो.

परंतु अंकशास्त्रानुसार बघितले तर नवीन मोबाईल नंबर घेताना आपले शत्रू अंक  कोणते आहेत आणि ते मोबाईल नंबरमध्ये किंवा कुठेही नसता कामा नये याबाबतची माहिती देखील अंकशास्त्रामध्ये दिलेली आहे. त्यामुळे मोबाईल नंबर घेताना देखील अंकांचा विचार करून घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर नाहकच जीवनामध्ये असंख्य अडचणींना आणि संकटांना तोंड द्यायची वेळ येऊ शकते.

 मोबाईल नंबरमध्ये असलेले हे अंक वाढवतात व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी

1- 14 किंवा 41- बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण मोबाईल नंबर घेतो तेव्हा त्या नंबरच्या अंकांमध्ये अनेकदा काही अंक जोड्यांमध्ये येतात. अशा प्रकारच्या काही अंकांमुळे आयुष्यात काही गंभीर समस्या येऊ शकतात.

प्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये जर 14 किंवा 41 क्रमांक एकत्र असतील तर अशा व्यक्तीला आर्थिक दृष्टिकोनातून कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा पैशांची मोठ्या प्रमाणावर हानी होऊन कुटुंब देखील उध्वस्त होण्याची शक्यता असते व समाजात बदनामी होऊ शकते.

2- 16 किंवा 61 क्रमांक जर एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकामध्ये 16 किंवा 61 हे अंक कुठेही एकत्र असतील तर अशा व्यक्तीच्या जोडीदाराची तब्येतीची समस्या अनेकदा उद्भवते. वैवाहिक जीवनामध्ये देखील अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. उत्पन्नात देखील कमी येते व पैसा आणि नोकरीच्या समस्या कायम राहतात. अशा व्यक्तीचे कुटुंब किंवा नातेवाईकांशी चांगले संबंध असू शकत नाही.

(टीपवरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीचे आम्ही कुठल्याही प्रकारचे समर्थन किंवा याविषयीचा दावा करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe