Real Estate:- घराची खरेदी करणे सध्याच्या महागाईच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवघड असून मोठ्या शहरांमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर तुम्हाला लाखो रुपये यासाठी मोजावे लागतात. तसे पाहायला गेले तर आता ग्रामीण भागामध्ये देखील घरांच्या किंवा जागांच्या किंमतींमध्ये भरमसाठ अशी वाढ झालेली आहे असून ग्रामीण भागामध्ये देखील जागा घेऊन घर बांधणे किंवा बिल्डरांच्या माध्यमातून घर घेणे आता महाग झालेले आहे.
या अनुषंगाने घर खरेदी करण्या अगोदर प्रत्येक बाबींची चौकशी करणे खूप गरजेचे ठरते. कारण हा लाखो रुपयांचा व्यवहार असतो व त्यामध्ये गोष्टीची सांगोपांग माहिती घेऊन व्यवहार पूर्ण करणे हे भविष्यकालीन दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरते.

त्यामुळे तुम्ही जर बिल्डर किंवा प्रॉपर्टी डीलरच्या माध्यमातून घर किंवा फ्लॅट खरेदी करत असाल तर मात्र तुम्ही काही गोष्टी त्यांना विचारले खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चाताप करायची वेळ येणार नाही.
घर खरेदी करा परंतु त्या आधी बिल्डरला हे विचारा
1- प्रकल्पासाठी वापरलेली जमीन कोणाच्या नावावर होती किंवा आहे?- जेव्हा बिल्डरच्या माध्यमातून गृहप्रकल्प उभारले जातात तेव्हा प्रकल्पासाठी वापरलेली जमीन त्यांनी कोणाकडून तरी खरेदी केलेली असते. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा बिल्डरकडून किंवा बिल्डर उभारत असलेल्या प्रकल्पातून घर खरेदी करत असाल तर तुम्ही संबंधित जमिनीचे मूळ मालक तपासणे गरजेचे आहे व त्या जमिनीचा मालक तपासण्यासाठी तुम्ही बिल्डरला संबंधित जमिनीची कागदपत्रे दाखवण्यास सांगू शकतात.
बऱ्याचदा असे होते की काही बिल्डर किंवा प्रॉपर्टी डीलर बांधकामाचा आराखडा मंजूर होण्याअगोदरच फ्लॅट विक्री करायला सुरुवात करतात व असे करणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे या बाबतीत देखील सावध राहणे गरजेचे आहे. बिल्डरने तुम्हाला जो काही आराखडा दाखवलेला आहे व नंतर तो प्राधिकरणाने जर बदलला तर तुमचे मोठे नुकसान होण्याची यामध्ये शक्यता असते.
2- संबंधित प्रकल्पाला बँकेची मंजुरी आहे का?- रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे की जर बँकेकडून मंजुरी मिळालेल्या प्रकल्पामध्ये तुम्ही घर खरेदी केले किंवा घरासाठी गुंतवणूक केली तर ती सुरक्षित असते.
बँकेच्या माध्यमातून जेव्हा मंजुरी दिली जाते तेव्हा बँकेकडून योग्य तपास करून संबंधित प्रकल्प मंजूर केला जात असतो. प्रकल्प कितीही चांगला असला तरी बँक ही मंजुरी देण्यासाठी दोन ते आठ महिन्याचा कालावधी लावते किंवा तेवढा कालावधी लागतो.
कालावधीमध्ये बँकेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या विषयीच्या आवश्यक सगळ्या तपासण्या केल्या जातात व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाते.
त्यामुळे बँकेच्या माध्यमातून प्रकल्पाला मंजुरी मिळाली असेल तर अशा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. या उलट जर प्रकल्पाला बँकेची मंजुरीच नसेल तर मात्र गुंतवणूक न करणे फायद्याचे ठरते.
3- घराच्या किमतींमध्ये नंतर वाढ होऊ शकते का?- जेव्हा बिल्डर व ग्राहक यांच्यामध्ये खरेदीचा करार होतो त्यामध्ये एक क्लोॅज दिलेला असतो व तो असा असतो की मालमत्तेसाठी जी काही किंमत आकारण्यात येत आहे त्या किमतीत भविष्यात आणखी वाढ होणार नाही. अशा पद्धतीचा क्लोॅज आहे की नाही हे देखील तपासणे गरजेचे आहे.
जर असा क्लोॅज असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून काही प्रकारचे अतिरिक्त असे शुल्क बिल्डरवर आकारले जात असते व तेव्हाच खर्चामध्ये वाढ होऊ शकते.
तसेच बिल्डर व खरेदीदाराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या करारामध्ये असे देखील नमूद केलेले असते की एखाद्या वेळेस सुपर एरियामध्ये बदल होऊ शकतो व ताबा देताना त्यामध्ये आठ ते दहा टक्के बदल होण्याची शक्यता असते व त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. ते जर काही नमूद केले असेल तर तुम्ही खरेदी करण्यापूर्वीच अशा गोष्टी स्पष्टपणे विचारून घेतलेल्या बऱ्या.
4- पेमेंट पर्याय बद्दल बिल्डरने सांगितले आहे का?- जेव्हा तुम्ही डेव्हलपर कडून किंवा बिल्डरच्या माध्यमातून एखादा फ्लॅट खरेदी करतात तेव्हा तुम्हाला अनेकविध असे पेमेंट करण्याचे पर्याय दिले जातात. तुम्ही घराचा ईएमआय भरताना जर काही मागेपुढे झाल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो? या बद्दलची कल्पना देणे देखील आवश्यक असते.
तसेच अपार्टमेंट तयार असून देखील तुम्ही जर संबंधित घराचा ताबा घ्यायला उशीर केला तरी बिल्डर तुमच्यावर काही दंड आकारू शकतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे समजा तुम्ही डेव्हलपरला एखादा चेक दिलेला आहे व तो जर बाउन्स झाला तर बऱ्याचदा डेव्हलपर आठ हजार रुपये पर्यंत यामध्ये प्रशासकीय हँडलिंग शुल्क लागू शकतो.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही चेक देत असाल तर तुमच्या खात्यातील रक्कम पुरेशी आहे की नाही याची देखील खात्री करणे यामध्ये गरजेचे असते या सगळ्या गोष्टी बिल्डरला विचारून घेणे गरजेचे आहे.
5- पेमेंटचा अंतिम आकडा विचारणे– जेव्हा तुम्ही घर खरेदीच्या संबंधित पेमेंट करता तेव्हा त्यामध्ये सर्व काही समाविष्ट केले आहे अशा पद्धतीचा दावा डीलरच्या माध्यमातून केला जातो. परंतु तुम्ही जी काही किंमत देत आहात त्यामध्ये नेमके काय काय समाविष्ट केलेले आहे हे बिल्डर कडून लिखित स्वरूपामध्ये घ्यावे. कारण बऱ्याचदा करारामध्ये अटी व शर्ती असं बारीक अक्षरांमध्ये लिहिलेले असू शकते
व त्यामुळे हेच कारण देत बिल्डर अतिरिक्त पैसे देण्याची मागणी तुमच्याकडून करू शकतो. त्यामुळे तुम्ही जे काही पेमेंट करत आहात त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे केव्हा कोणत्या गोष्टींचे पेमेंट यामध्ये आकारण्यात आलेले आहे हे लिखित स्वरूपामध्ये घेऊन भविष्यात बिल्डर तुमच्याकडून जे काही अतिरिक्त पैसे मागू शकतो त्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकतात.