CRPF Recruitment 2024:- तुम्ही देखील दहावी पास असाल आणि तुम्हाला संरक्षण किंवा निम लष्करी दलामध्ये भरती व्हायचे असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. ग्रामीण भागात असो की शहरी भागामध्ये असो मोठ्या प्रमाणावर अनेक दहावी आणि बारावी पास तरुण संरक्षण क्षेत्रातील भरतीच्या दृष्टिकोनातून तयारी करत असतात व यामध्ये प्रामुख्याने आर्मी तसेच सीआरपीएफ,
बीएसएफ तसेच सीआयएसएफ सारख्या निमलष्करी दलांच्या भरतीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करणारे तरुण आपल्याला दिसून येतात. या अनुषंगाने जर तुम्ही देखील दहावी पास असाल व सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर केंद्रीय रिजर्व पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफ च्या माध्यमातून भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
किती जागांसाठी होत आहे ही भरती
सीआरपीएफच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे व यामध्ये तब्बल एकूण 11541 कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार असून एकूण पदांपैकी 11299 पदे पुरुषांची असून 242 पदे महिलांसाठी आहेत. म्हणजेच या भरती प्रक्रियेमध्ये पुरुषांच्या साठी असलेले पदांची संख्या जास्त आहे.
या भरतीमध्ये कशी केली जाईल निवड?
सीआरपीएफ च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया पाहिली तर ती काही टप्प्यांच्या आधारे केली जाणार आहे व या टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पदांवरील निवड अनेक स्तरांच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल व ज्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीईटी आणि पीएसटी चाचणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल व हे टप्पे पार करणारे पुढच्या टप्प्यात जातील आणि निवडीसाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील ते उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
आवश्यक वयोमर्यादा
सीआरपीएफच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदासाठी राबवण्यात येणार्या या भरती प्रक्रियेसाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांचे वय 18 ते 23 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. याबद्दलची माहिती अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकतात.
किती लागेल अर्जासाठी फी?
सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी फॉर्म भरण्याकरिता शंभर रुपयांचे शुल्क भरणे गरजेचे आहे. हे शुल्क जनरल तसेच ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी असून एससी तसेच एसटी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?
या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 18000 ते 69 हजार 100 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.