SUV Car Discount Offer:- सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून वाहनांची खरेदी केली जाते. कारण अशा कालावधीमध्ये शुभमुहूर्तावर एखादे वाहन खरेदी करणे हे चांगले मानले जाते व भारतामध्ये दसरा तसेच दिवाळी व नवरात्रीमध्ये वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.
गणपती उत्सवानंतर आता सणांचे वेध लागले असून आपल्यापैकी बरेच जण आता कार खरेदी किंवा बाईक खरेदी करण्यासाठी प्लॅनिंग करत असणार व त्यामुळेच अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील ग्राहकांना आकर्षक अशा डिस्काउंट ऑफर कार खरेदीवर देण्यात येत आहेत.
त्यामुळे तुम्हाला देखील नवरात्रीमध्ये एसयुव्ही कार खरेदी करायची असेल तर ही एक सुवर्ण संधी आहे. या अनुषंगाने या लेखात आपण कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या कारवर किती डिस्काउंट दिला जात आहे याबद्दलची माहिती बघू.
कोणत्या कंपनीच्या कोणत्या कारवर किती मिळत आहे डिस्काउंट?
1- मारुती सुझुकी जिम्नी– मारुती जिम्नी वर सणासुदीच्या कालावधीमध्ये उत्तम अशी ऑफर मिळत असून या कारच्या टॉप स्पेक अल्फावर तब्बल अडीच लाख रुपयापर्यंत सूट मिळत आहे. तसेच या कारच्या झेटा व्हेरियंटवर एक लाख 95 हजार रुपये पर्यंत सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे
विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे यामध्ये 45 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. सध्या ही कार महिंद्राच्या थार आणि गुरखाशी स्पर्धा करते. मारुती जिम्नीची सध्याची एक्स शोरूम किंमत बारा लाख 74 हजार ते 14 लाख 79 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
2- निसान मेग्नाईट– निसानच्या मॅग्नाइटमध्ये 1.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून ते शंभर एचपी पावर निर्माण करते. या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारच्या व्हेरिएंट वर एकूण 1.25 हजार रुपयापर्यंत सूट उपलब्ध आहे.
या ऑफरमध्ये रोख सवलत तसेच एक्सचेंज बोनस, कार्पोरेट सूट आणि रॉयल्टी बोनस यांचा समावेश आहे. या कारची अगदी सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सध्या सहा लाख ते दहा लाख 66 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
3- टाटा नेक्सन– नवरात्रीच्या कालावधीमध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे एकूण फायदे टाटाच्या या सर्वात आवडत्या कार Nexon कॉम्पॅक्ट एसयुव्हीवर उपलब्ध आहेत. कंपनी या कारच्या एन्ट्री लेव्हल स्मार्ट(O), स्मार्ट+ आणि स्मार्ट+ एस प्रकारावर मात्र कोणत्याही प्रकारची सूट देत नाही.
दुसरीकडे मात्र 2023 मध्ये उत्पादित केलेल्या मॉडेल्सवर 16 हजार रुपयांची अतिरिक्त रोख सूट मिळत आहे. तसेच टाटा नेक्सनच्या रेंज टॉपिंग फिअरलेस ट्रिमवर तुम्हाला साठ हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू आणि महिंद्रा एक्सयुव्ही 3XO ही स्पर्धा करते. या कारची किंमत सध्या आठ लाख रुपये ते 15.8 लाख रुपये इतकी आहे.
4- महिंद्रा बोलेरो निओ– महिंद्राच्या एसयुव्ही कार बोलेरो बी 6 ओपीटी व्हेरियंटवर 90 हजार रुपयांपर्यंत सूट आणि फायदे मिळत आहेत. त्याच्या मिड स्पेक व्हेरिएंट बी6 आणि एन्ट्री लेवल व्हेरियंट बी4 वर अनुक्रमे 17000 आणि 1000 पर्यंत सूट मिळत आहे.
बोलेरो निओमध्ये 1.5- लिटर डिझेल इंजन आहे जे 76 एचपी पावर निर्माण करते. सध्या या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 79 हजार ते दहा लाख 91 हजार रुपये दरम्यान आहे.
5- मारुती फ्रॉन्क्स– मागच्या महिन्याच्या तुलनेस फ्रॉन्क्स टर्बो ऑटोमॅटिक वरील सूट किंचीत वाढवण्यात आलेली आहे व या प्रकारावर 83 हजार रुपये पर्यंतचे एकूण फायदे सध्या उपलब्ध आहेत. सध्या यामध्ये फ्रॉन्क्स वेलोसिटी एडिशन पॅकेजेचा समावेश करण्यात आला आहे. या फ्रॉन्क्स वेलोसिटीच्या किमतीवर 40 हजारची सूट उपलब्ध आहे.
या कारमध्ये नॅचरल अस्पिरेटेड 1.2- लिटर पेट्रोल फ्रॉन्क्स वर 35 हजार रुपयापर्यंत सूट मिळत आहे तर 1.2 लिटर पेट्रोल सिग्मावर 32500 पर्यंतचा फायदा मिळत आहे. तसेच फ्रॉन्क्सच्या डेल्टा, डेल्टा प्लस आणि डेल्टा प्लस(O) प्रकारावर प्रत्येकी 30 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच या कारमधील सीएनजी व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांच्या सवलत सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.