बीजेपीचा मोठा निर्णय ! ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार, महत्वाचे परिपत्रक जारी

या पत्रकात भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायला हवं असं म्हणतं त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडे आहेच, तसेच अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने निवडणुका लढवायच्या आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. लवकरच निवडणुका आयोग महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार खलबत सुरू आहे.

अशातच मात्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लढवणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

या चर्चांना जोर धरण्याचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे ज्यामध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका राज्यातील तीन महत्त्वाच्या नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवण्याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

या पत्रकात भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायला हवं असं म्हणतं त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडे आहेच, तसेच अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने निवडणुका लढवायच्या आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लढवणार अशा चर्चांनी जोर पकडला आहे. खरे तर गत लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसलाय.

यामुळे विधानसभा निवडणुका सुरू होण्याआधी भारतीय जनता पक्ष समवेत महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या माध्यमातून रणनीती आखली जात आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणुकीची मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.

भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नागपूरात येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.

याच बैठकीत पक्षाने एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले ज्यात आगामी निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवल्या जाणार असे संकेत केंद्रीय नेतृत्वात कडून देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe