साखळाई योजनेतील प्रमुख अडथळा म्हणजेच आ. बबनराव पाचपुते होय! नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांची टीका

 साकळाई उपसा जलसिंचन योजना ही एक अहमदनगर जिल्ह्यातील खूप महत्त्वाची योजना असून नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर ही नियोजित साखळी उपसा सिंचन योजने करिता आवश्यक असणारे अपेक्षित पाणी कुकडीत शिल्लक आहे

Ajay Patil
Published:
babanrao pachpute

साकळाई उपसा जलसिंचन योजना ही एक अहमदनगर जिल्ह्यातील खूप महत्त्वाची योजना असून नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर ही नियोजित साखळी उपसा सिंचन योजने करिता आवश्यक असणारे अपेक्षित पाणी कुकडीत शिल्लक आहे

परंतु फक्त त्यासंबंधीचे म्हणजेच पाणी उपलब्धतेचे जे काही प्रमाणपत्र असते ते मिळत नसल्यामुळे साखळी योजना रखडली असून ही योजना रखडण्यामागे श्रीगोंदे नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. बबनराव पाचपुते हे  जबाबदार असल्याची जळजळ टीका श्रीगोंदे आणि नगर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी व विविध गावच्या सरपंचांच्या माध्यमातून करण्यात आली.

 सकाळी योजनेतील प्रमुख अडथळा म्हणजेच बबनराव पाचपुते होय

नियोजित साकळाई उपसा सिंचन योजेनासाठी कुकडीत अपेक्षित पाणी शिल्लक आहे. केवळ पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने ही योजना रखडली आहे. त्यासाठी श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघाचे आ. बबनराव पाचपुते झारीतील शुक्राचार्याची भूमिका करत आहेत. तेच या योजनेसाठी प्रमुख अडथळा असल्याची सणसणाटी टिका आज नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी व विविध गावच्या सरपंचांनी केली.

साकळाई उपसा जलसिचन योजनेसाठी पाणी मिळावे, योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखला तातडीने देण्यात, या प्रमुख मागणीसाठी आज साकळाई पाणी योजना कृती समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे यांच्या नेतृत्वाखाली व नगर-श्रीगोंद्यातील नेत्यांनी नगर-दौंड महामार्ग अडविला होता. त्यावेळी सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेत आ. बबनराव पाचपुतेच यासाठी प्रमुख अडथळा असल्याची भूमिका मांडत त्यांच्यावर टीका केली.

साकळाई पाणी योजनेच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहन कृती समितीमधील जवळपास सर्वांनीच केले. तसेच आ. पाचपुते यांनी भूमिका जाहीर न केल्यास त्यांना ३५ गावांनी गावबंदी करावी, अशी भूमिका चिखलीचे सरपंच दरम्यान, पाणी उपलब्धदाखला मिळण्यासाठी सिचन भवनवर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून गाजत असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने मिळावे, साकळाईच्या आराखड्यात मंजूरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी साकळाई कृती समितीच्यावतीने नगर- दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.

साकळाई पाणी योजना कृती समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, ज्येष्ठ नेते  घनःश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, ज्येष्ठ नेते संतोष लगड, राजेंद्र म्हस्के, सोमनाथ घाडगे, सुवर्णा पाचपुते, ज्ञानदेव भोसले, नारायण रोडे, दादा दरेकर, अजिनाथ गायकवाड, दत्ता काळे, रघुनाथ चोभे, महेश कोठुळे, अरुण कोठुळे यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा महाराज झेंडे म्हणाले, गेल्या ३० वर्षापासून साकळाई योजनेचा लढा सुरु आहे. या योजनेच्या नावाखाली अनेकांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्यात. पण आता शेतकरी हुशार झाले आहेत. साकळाईच्या जिवावर मोठे झालेल्यांना शेतकरी चांगलाच हिसका दाखवतील. आतापर्यंत साकळाईला पुणेकरांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. साकळाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यांनी साकळाईला आमचा विरोध नसल्याचे सांगत सध्याच्या सरकारने योजनेचा प्रश्न सोडवावा.

या सरकारने साकळाईचा प्रश्न न सोडविल्यास महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हा प्रश्न मार्गी लावण्याची माझी जबाबदारी असले असे सांगत कृती समितीला आश्वस्त केले असल्याचे झेंडे म्हणाले.राजेंद्र झेंडे यांनी त्यानंतर स्थानिक नेत्यावर सडकून टिका केली. साकळाईचे पाणी पुणेकर अडवत असतील, तर नगरचे पुढारी काय गवत उपटण्याचे काम करतात का ? असा जाहीर सवाल केला.

पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे सरपंच ज्ञानेश्वर कवडे म्हणाले. ३५ गावातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधल्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही, असे नारायण रोडे म्हणाले.संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अनिल महाराज कोठुळे, सोमनाथ धाडगे, राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते आदींची भाषणे झाली. यावेळी कुकडी प्रकल्प विभागाचे अधिकारी कदम यांनी साकळाईच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. रास्तारोको आंदोलनासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पंडित महाराज टकले, ह. भ. प. दत्तात्रय महाराज झेंडे. सुनील लोंढे सरपंच ज्ञानदेव कवडे, सरपंच संजय धुमाळ, काशिनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोने बापू आणि सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन कारले, डॉ. योगेंद्र खाकाळ, संतोष जाधव, दिनुकाका पंधरकर, उपसरपंच अनिल वाणी, अमोल लंके, तुकाराम काळे, बाजीराव महाराज झेंडे, अनिल महाराज कोठुळे रोकडे, बाबासाहेब कर्डिले, आकाश लंके, गणेश झरेकर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe