7 Seater Car: सणासुदीला घ्या ‘ही’ सर्वाधिक मायलेज देणारी 7 सीटर कार! इतर कंपन्यांच्या कार आहेत तिच्यासमोर फिक्या

7 Seater Car:- कार घेण्याच्या बाबतीत जर आपण ग्राहकांची पसंती पाहिली तर आता मोठ्या प्रमाणावर सात सीटर कारला पसंती दिली जाते. कारण सात सीटर कार ही कुटुंबाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे असते व त्यामुळे सात सीटर कारला मागणी जास्त दिसून येते.

भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक नामांकित कंपन्यांच्या 7 सीटर कार असून या पर्यायांमधून ग्राहक परवडणाऱ्या किमतीत व जास्त मायलेज देणाऱ्या कारची निवड करत असतात.

या अनुषंगाने तुम्हाला देखील जर सात सीटर कार घ्यायची असेल तर तुम्ही कारची निवड करताना मारुती सुझुकी एर्टिगाची निवड करू शकतात. अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांच्या कार देखील मारुती सुझुकीच्या या कार पुढे फिक्या पडतात.

 किती मायलेज देते मारुती सुझुकी एर्टिगा?

जर आपण मारुती सुजुकी एर्टिगाचे मायलेज पाहिले तर या कारचा पेट्रोल प्रकार अंदाजे 20.3 किलोमीटर पर लिटर इतके मायलेज देतो. तर मारुती सुझुकी एर्टिगाचा सीएनजी प्रकार अंदाजे 26.11 किलोमीटर पर किलोग्राम इतके मायलेज देते. या कारमध्ये इंजिन हे 1.5- लिटर पेट्रोल इंजिनसह येते.

 काय आहेत या कारमध्ये वैशिष्ट्ये?

या कारमध्ये प्रगत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम  देण्यात आले असून आरामदायक असे सात सीटर आसनव्यवस्था देण्यात आलेली आहे. तसेच देखभाल खर्च देखील कमीत कमी असून सीएनजी प्रकारात ही कार चांगले मायलेज देते.

 मारुती सुझुकी एर्टिगा इतर कारपेक्षा का आहे चांगली?

1- बजेटच्या बाबतीत मारुती सुझुकी एर्टिगाची किंमत आणि इंधन कार्यक्षमता मोठ्या फॅमिली कारपेक्षा अधिक आकर्षक आहे व ती बजेटमध्ये आहे.

2- कमी मेंटेनन्स मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या कमी देखभाल खर्च आणि देशभरातील सेवा केंद्रांच्या उपलब्धतेमुळे देखील मोठ्या प्रमाणावर पसंत केल्या जातात.

3- सीएनजीचा पर्याय मारुती सुझुकी एर्टिगा चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार पेट्रोल सोबतच सीएनजी पर्याय मध्ये देखील मिळते. त्यामुळे चांगले मायलेज मिळवण्यासाठी हा पर्याय फायद्याचा ठरतो.

4- प्रशस्त असे इंटेरियर या कारमध्ये आरामदायी जागा आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह आरामदायी प्रवासासाठी एर्टिगा हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ही कार उत्तम पर्याय ठरते.

5- मायलेजच्या बाबतीत उत्तम आपण कार बाजारपेठेतील अनेक मोठ्या कंपन्यांच्या सात सीटर कार पाहिल्या तर त्या कार देखील मारुती एर्टिगासमोर मायलेजच्या बाबतीत मागे आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे ही कार फायदेशीर व परवडणारी 7 सीटर कार म्हणून एक उत्तम पर्याय ग्राहकांसाठी बनली आहे.