Konkan Railway Bharti 2024: कोंकण रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी “सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil / Electrical), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III (Mechanical / Electrical), ESTM -III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर” इत्यादी विविध पदांच्या भरतीसाठी एकूण 190 जागांसाठी ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात तसेच अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे तसेच अर्ज करण्यासाठी 07 ऑक्टोबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे अंतिम तारीख संपण्याआधी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावा.

Konkan Railway Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
कोंकण रेल्वे अंतर्गत ही भरती एकूण 190 जागांसाठी होत आहे आणि खालील पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे –
- सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil): 05 जागा
- सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical): 05 जागा
- स्टेशन मास्टर: 10 जागा
- कमर्शियल पर्यवेक्षक: 05 जागा
- गुड्स ट्रेन मॅनेजर: 05 जागा
- टेक्निशियन III (Mechanical): 20 जागा
- टेक्निशियन III (Electrical): 15 जागा
- ESTM-III (S&T): 15 जागा
- असिस्टंट लोको पायलट: 15 जागा
- पॉइंट्स मन: 60 जागा
- ट्रॅक मेंटेनर-IV: 35 जागा
- एकूण 190 जागा उपलब्ध
शैक्षणिक पात्रता:
- मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी,ITI संबंधित विषयात उत्तीर्ण, पदवीधर असलेले उमेदवार
- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकता.
नोकरीचे ठिकाण:
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यापैकी कुठेही.
वयोमर्यादा:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया:
या भरतीमध्ये अंतिम उमेदवाराची थेट परीक्षा द्वारे निवड करण्यात येणार आहे.
महत्त्वाची तारीख:
जे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांनी अर्ज करण्याच्या शेवटची तारीख संपण्याआधी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे.
महत्त्वाच्या लिंक्स:
खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही या भरती संदर्भातील पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता तसेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी यांची डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही त्यांच्या होम पेजवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | Apply Online |
अधिकृत संकेतस्थळ | https://konkanrailway.com/ |