Farmer Success Story: नाशिक जिल्ह्यातील चव्हाण दाम्पत्य ड्रॅगन फ्रुट मधून वर्षाला कमवतात 10 ते 12 लाख! वाचा त्यांचे शेतीचे नियोजन

नासिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या रायते या गावचे जगन्नाथ आणि सरला चव्हाण या दाम्पत्याने ड्रॅगन फ्रुट लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधलेली आहे. त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या पाच एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

Ajay Patil
Published:
dragon fruit

Farmer Success Story:- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड शेतीमध्ये करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत व यामुळे आता शेतकरी हळूहळू समृद्धीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षापासून जर आपण शेती क्षेत्राचा मागोवा घेतला तर पारंपरिक पिकांऐवजी मोठ्या प्रमाणावर आता भाजीपाला पिके आणि फळ पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे.

फळबागांमध्ये काही फळबागांची लागवड एकदा केली तर शेतकऱ्यांना दहा ते पंधरा वर्षे पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असल्याने एक वर्षाला जास्तीचा उत्पादन खर्च करण्याची गरज शेतकऱ्यांना भासत नाही.

परंतु त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न मात्र तितकेच मिळत राहते. तसेच फळबागांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये आता ड्रॅगन फ्रुट सारख्या फळ पिकांनी शेतकऱ्यांना समृद्ध केल्याच्या अनेक यशोगाथा आपण बघितले असतील.

अगदी याच पद्धतीने नासिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या रायते या गावचे जगन्नाथ आणि सरला चव्हाण या दाम्पत्याने ड्रॅगन फ्रुट लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साधलेली आहे. त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या पाच एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

 अशाप्रकारे वळले ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रायते या गावचे जगन्नाथ चव्हाण व त्यांच्या पत्नी सरला चव्हाण यांनी आधुनिक शेतीची कास धरली व ज्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये ते मका तसेच कांदा इत्यादी परंपरागत पिके घेत होते त्या ऐवजी त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला.

पारंपारिक पीक लागवडीमध्ये उत्पादनाचा खर्च व उत्पन्न यांचा कुठल्याही प्रकारे ताळमेळ बसत नसल्यामुळे या अगोदर त्यांनी द्राक्ष लागवडीचा प्रयोग केला होता व त्यामध्ये त्यांना हवे तेवढे यश मिळाले नाही. दुसरे काहीतरी करावे या प्रयत्नात असताना एकदा टीव्हीवर त्यांना ड्रॅगन फ्रुट शेतीची माहिती मिळाली व त्यानंतर मात्र त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा धाडसी निर्णय घेतला.

याकरिता त्यांनी हैदराबादहून रोपे मागवली व 2019 मध्ये दोन एकर क्षेत्रात 12 बाय सात फूट अंतरावर जम्बो रेड जातीच्या ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. यासाठी त्यांना मशागत व रोपे तसेच लागवड इत्यादीसाठी एका एकरला पावणे चार लाख रुपये खर्च लागला. यामध्ये बँकेच्या आर्थिक सहाय्य त्यांना मिळाल्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवडी संबंधीच्या अनेक गोष्टी पूर्ण करता येणे त्यांना शक्य झाले.

आज चार एकर शेतीमध्ये त्यांची ड्रॅगन फ्रुट लागवड असून यामध्ये त्यांनी अमेरिकन ब्युटी, सी व सुरुवातीची जम्बो अशा तीन वानांची लागवड केली आहे. पाण्याचे कार्यक्षम वापर करण्याकरिता त्यांनी सेंद्रिय टाकाऊ घटकांचे आच्छादन या बागेला केलेले आहे उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करणे त्यांना अगदी सोपे झालेले आहे. तसेच जीवामृत चा वापर करून मातीची सुपीकता वाढवण्यावर त्यांनी भर दिलेला आहे.

 किती मिळते ड्रॅगन फ्रुट लागवडीतून त्यांना उत्पन्न?

ड्रॅगन फ्रुटची जर आपण उत्पादनाची पद्धत पाहिली तर जून महिन्यामध्ये हे फळपीक  फुलोरा अवस्थेत येते व जुलै महिन्याच्या शेवटी उत्पादन मिळायला सुरुवात होते. साधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर हा उत्पादनाचा कालावधी राहतो. या संपूर्ण कालावधीमध्ये ड्रॅगन फ्रुटचे पाच ते सात तोडे होतात व चव्हाण यांना एकरी 14 ते 15 टन उत्पादन मिळत असून ते गुजरात तसेच नाशिक बाजारपेठेत विक्री करतात व काही ड्रॅगन फ्रुटची विक्री जागेवरच केली जाते.

सध्या ड्रॅगन फ्रुटला 80 ते 150 रुपये असा सरासरी दर मिळत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. एका एकरकरिता खत व्यवस्थापन व मजूर असे मिळून 50 हजारांचा खर्च त्यांना येत असून दहा ते बारा लाखांचा नफा या माध्यमातून मिळत आहे.

विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट पासून मिळालेल्या पैशातून त्यांनी हरिप्रिया नावाची दुमजली इमारत बांधली असून यावर ड्रॅगन फ्रुटचे अनेक चित्र देखील रेखाटण्यात आलेले आहेत. तसेच शेतीमध्ये आवश्यक  यांत्रिकीकरण करण्याला देखील त्यांना यामुळे हातभार लागलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe