Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. जर तुमचेही रेशन कार्ड असेल आणि तुमच्या कार्ड मध्ये तुम्हाला नवीन सदस्याचे नाव ॲड करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
खरे तर कुटुंबात नवीन बाळाचा जन्म झाल्यानंतर रेशन कार्डवर त्या बाळाचे नाव ॲड करावे लागते. तसेच जर कुटुंबातील एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल तर घरात आलेल्या नववधूचे देखील रेशन कार्ड वर नाव जोडावे लागते.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून रेशन कार्ड वर नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी काय प्रोसेस असते आणि यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो असे काही प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज आपण याच साऱ्या प्रश्नांचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड वर नाव जोडायचे असेल तर कोणता फॉर्म भरावा लागणार?
रेशन कार्ड वर जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल तर यासाठी फॉर्म तीन भरावा लागतो. हा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरला जाऊ शकतो. हा फॉर्म सबमिट करताना तुम्हाला काही कागदपत्र देखील जमा करावी लागतात.
अन्न विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रेशन कार्ड वर नवीन नाव जोडण्याबाबतचा फॉर्म तीन भरु शकता. जर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरता येत नसेल तर तुम्ही जवळील सीएससी सेंटरवर जाऊन हे काम करू शकता.
कोणती कागदपत्रे लागतात
कुटुंबात नवीन बाळाचा जन्म झाला असेल आणि जर त्याचे नाव रेशन कार्ड वर जोडायचे असेल तर यासाठी तुम्हाला त्याचा जन्म दाखला लागणार आहे.
तसेच जर कुटुंबातील एखाद्या पुरुषाचे लग्न झालेले असेल आणि घरात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड वर ऍड करायचे असेल तर यासाठी विवाह दाखला अन तिच्या माहेरील रेशन कार्ड वरील नाव कमी केल्याबाबतचा दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे.
या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या काही दिवसात नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड वर ऍड होते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या पद्धतीने अर्ज केला आणि योग्य कागदपत्रे दिलीत तर फक्त पंधरा दिवसात नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड वर जोडले जाते.