विधानसभा निवडणुकांची धामधूम सध्या महाराष्ट्रात सुरू असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत व त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलेला आहे. यामध्ये थेट कार्यकर्त्यांपासून तर नेतेमंडळी पर्यंत सगळ्यांची लगबग सुरू असलेली आपल्याला दिसून येत आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये तर काहींनी काही झाले तरी या निवडणुकीमध्ये उभे राहायचे असा चंगच बांधला आहे. याकरिता जर पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची पण लढवायचीच.
या सगळ्या प्रकारामुळे बऱ्याच पक्षांना बंडखोरीला देखील सामोरे जावे लागू शकते. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील अनेक इच्छुकांची गर्दी केली असून अनेक जण विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहेत.
परंतु खास करून श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप आणि दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर हे दोघेही जण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत शरद पवार कोणाला तिकीट देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीगोंदा विधानसभेतून शरद पवार अण्णासाहेब शेलार यांना तिकीट देतील की राहुल जगताप यांना?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी काही दिवसांपूर्वी माळेगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृहामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतलेली होती
व त्याचप्रमाणे दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी देखील शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. अण्णासाहेब शेलार देखील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असून हे पूर्वीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या दोघांपैकी आता शरद पवार कोणाला तिकीट देतील? हे येणारा काळच ठरवणार आहे.
अण्णासाहेब शेलार यांची आहे निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका
माजी आमदार राहुल जगताप यांनी जरी शरद पवार यांची भेट घेतलेली असली तरी देखील अण्णासाहेब शेलार हे मात्र श्रीगोंदा मधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यासंबंधीची चाचपणी देखील त्यांचे सुरू आहे.
यापूर्वी दोनदा इतरांसाठी निवडणूकीतून माघार घेतली.परंतु यावेळेस मात्र जनतेचा आग्रह असल्याने आम्ही निवडणूक लढवणारच आहोत अशी ठाम भूमिका अण्णासाहेब शेलार यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता शरद पवार श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नेमके कोणाला तिकीट देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
2019 ची निवडणूक कशी झाली होती?
2019 सालची विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. तेव्हा भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते एक लाख 3 हजार 258 मतांनी विजयी झाले होते व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम प्रतापराव शेलार यांचा 4750 मतांनी पराभव केला होता.